पुणे

Sushma Andhare : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा खळबळजनक सरकारवर आरोप

•Sushma Andhare ; पुणे कार अपघातातील धागेदोरे मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर

पुणे :- आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पुणे अपघात प्रकरण उचलून धरले असून, आता थेट सरकारवरच आरोप करत सुषमा अंधारे यांनी मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावरून या सर्व प्रकरणाचे धागेदोरे असल्याचे असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.मी कोणालाही सोडणार नाही, सर्वांची नावे सांगणार असल्याचा इशारा पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर अटक करण्यात आलेल्या डॉ. अजय तावरे यांनी दिला होता. यावरुन सुषमा अंधारे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे त्यांनी थेट मंत्रालयातील सहाव्या मजल्याशी जोडले आहेत. इतकेच नाही तर तर सत्ता बदलावेळी मंत्रालयाचा सहाव्या मजल्यावर नेमके काय घडले? हे सर्वही तावरेंकडून समोर येऊ शकते, असा खळबळजनक दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.

पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरण म्हणजेच हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपच्या रक्ताचे नमुने बदलण्याच्या आरोपात ससूनच्या दोन वरिष्ठ डॉक्टरांना अटक झाली आहे. यात अटक झालेले डॉ. अजय तावरे आणि डॉ. हरनोळ यांच्या जीविताला धोका असल्याचा संशय सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात 4 जूनला लोकसभा निकालानंतर आपण गौप्यस्फोट करणार असल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे. वास्तविक सध्या आचार संहिता लागू आहे. तसेच चार जूनला निकाल लागेपर्यंत पोलिसांवर ताण आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, त्यामुळे त्या नंतरच सर्व समोर आणू, असे देखील सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी मुलाला 12 तासाच्या आत जामीन मिळाला, पिझ्झा बर्गरच्या पार्त्या झाल्या, रक्ताचे सॅम्पल बदलले गेले हे सर्व इतक्या कमी वेळा घडले आहे. त्यामुळे पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही? असा प्रतिप्रश्नही अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0