क्राईम न्यूजमुंबई

Vasai-Virar Crime News : परदेशी नागरिकांकरिता मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 144 कलम लागू

Section 144 applied For Foreigner: मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) अन्वये मनाई आदेश लागू

मिरा रोड :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात अनेक परदेशी नागरीक येतात आणि आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणी वास्तव्य करतात. असे निदर्शनास आलेले आहे की, यामुळे काही असामाजिक तत्वांना मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत त्यांची ओळख आणि उपस्थिती लपवुन राहण्याची संधी प्राप्त होते. त्यावर आळा घालणेकामी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1), (2) अन्वये मनाई आदेश पारित केलेल्या आदेशानुसार बोडिंग हाऊस, क्लब, विश्रामगृहे (खासगी कंपनीचे विश्रामगृहांसह), पेयींग गेस्ट हाऊस, भाडेतत्वावर मिळणारी निवासस्थाने घरे सदनिका बंगले चाळ इत्यादी, रुग्णालये दवाखाने, व्यावसायिक होम स्टे सुविधा ज्या ठिकाणी परदेशी नागरिकांना आर्थिक किंवा exchange-क्रेडिट यांच्या मोबदल्यात निवास व्यवस्था उपलब्ध केली जाते., दुकाने‌ उपहारगृहे, सराई आणि जहाज बोटी इत्यादी ठिकाणी मालक,चालक,व्यवस्थापक यांना त्यांच्या आवारात परदेशी नागरिकांचे आगमन झाल्यापासुन 24 तासांच्या आत त्याबाबतची माहिती नजदीकचा पोलीस स्टेशन येथे देणे बंधनकारक आहे. तसेच या संस्थेमध्ये सध्या परदेशी नागरीक वास्तव्यास असल्यास त्याची माहिती सदरचा मनाई आदेश पारित झाल्यापासुन 24 तासाच्या आत पोलीसांना देणे बंधनकारक आहे. Vasai-Virar Crime News

आदेशाचे उल्लंघन करेल तो इसम भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे व इतर संबंधित कायदयांप्रमाणे शिक्षेस पात्र ठरेल. याबाबत दिनांक 01 मार्च ते 28 एप्रिल या कालावधीकरीता मिरा- भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात मनाई आदेश पारित करण्यात आला आहे. Vasai-Virar Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0