मुंबईसामाजिक

Budget Session : भाजपा आमदार राम कदम आणि रोहित पवार यांच्यात खडाजंगी

•योगेश सावंत मुद्द्यावरून आमदार रोहित पवार आणि राम कदम आक्रमक

मुंबई :- राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पन अधिवेशन सुरू असताना युट्यूबबर योगेश सावंत याच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारण आज चांगलेच तापले असून भाजपा आमदार राम कदम यांनी योगेश सावंत यांच्या एका सोशल पोस्टचा संदर्भ देत त्यात देवेंद्र फडणवीसांना संपवण्याची भाषा केल्याचा दावा केला. “एका व्हायरल क्लिपमध्ये राज्यात जातीवाद पसरवण्याचं षडयंत्र दिसत आहे. व्हिडीओत एक इसम म्हणतो की ‘देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्राच्या मातीत गाडणार. देवेंद्र फडणवीससारखे तीन मिनिटांत महाराष्ट्रातले आख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू’. याचं नाव आहे योगेश सावंत. याचे सबंध बारामतीहून आहे. तिथल्या वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना शरद पवार गटाचा आमदार व शरद पवारांचा नातू रोहित पवार फोन करून योगेश सावंतला सोडायला सांगतो. काय संबंध आहे रोहित पवारचा?” असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला. Ram Kadam Vs Rohit Pawar

राम कदम यांनी शरद पवार व रोहित पवार यांची नावं घेतल्याबाबत विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला. मात्र, आशिष शेलारांनी शरद पवारांचं नाव घेतलंच नसल्याचा दावा केला. तसेच, या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी केली. त्यावर तालिका अध्यक्षांनी तपासाचे आदेशही दिले. मात्र, सत्ताधारी आमदारांच्या या दाव्यांवर रोहित पवार यांनी परखड शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. Ram Kadam Vs Rohit Pawar

रोहित पवारांनी विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. “पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला आणलं होतं. त्याचा जबाब घेतला. आता त्याला कोर्टात नेत आहेत. मी त्याला स्वत: भेटण्यासाठी चाललो आहे. उगाच सत्ताधाऱ्यांनी तिथे अ‍ॅक्टिंग करू नये. जाहीरपणे सांगतोय ना, तो आमचा कार्यकर्ता आहे”, असं रोहित पवार म्हणाले. Ram Kadam Vs Rohit Pawar

तीन दिवसांपूर्वी एक बैठक झाली होती. त्या बैठकीत देवेंद्र फडणवीस चिडले होते की भाजपाच्या आमदारांपैकी कुणीही त्यांच्या बाजूने बोललं नाही. त्या दिवसांपासून आत्तापर्यंत पाहिलं तर त्यांच्या प्रत्येक भाषणात सामान्य माणूस कुठेही दिसत नाही, पण देवेंद्र फडणवीस मात्र नक्की दिसतात. त्यामुळे एखाद्या नेत्याला खूश करण्यासाठी तुम्ही उगाच एखाद्या कार्यकर्त्याची नावं घेत असाल, त्यांच्यावर कारवाई करत असाल तर आम्ही तरी शांत बसणार नाही” अशी टीकाही रोहित पवार यांनी केली. Ram Kadam Vs Rohit Pawar

सांताक्रुज पोलिसांनी अटक केलेल्या योगेश सावंत प्रकरणी भाजप आमदार राम कदम यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. योगेश सावंत आणि रोहित पवार यांचा संबंध काय? असा प्रश्न यावेळी भाजप आमदारांनी उपस्थित केला. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत खुलासा केला. योगेश सावंत हा कार्यकर्ता असून त्याची चूक कोणती? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. आमदार रोहित पवार यांनी यावेळी आपल्या कार्यकर्त्याची बाजू घेत एका यूट्यूब चॅनलने सामाजिक कार्यकर्त्याची मुलाखत घेतली आणि ती सोशल मीडियावर टाकली. त्याच्यावर तुम्ही कारवाई करता का? असा प्रश्न उपस्थित केला. तर मुलाखत घेणाऱ्यावर कारवाई का होत नाही? असे देखील ते म्हणाले. Ram Kadam Vs Rohit Pawar

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0