Vasai Crime News : घरफोडी आणि चोरी करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना केले जेरबंद
•नायगाव गुन्हे प्रकटीकरण विभागाची कारवाई ; तीन आरोपींच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात 1 आणि पवई पोलीस ठाण्यात 2 घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल,
वसई :- घरफोडी आणि चोऱ्या करत धुमाकूळ घालणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात गुन्हे प्रकटीकरण विभाग, नायगाव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तिघांकडून एक लाख 79 हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच आरोपींच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात 1 तर पवई पोलीस ठाण्यात 2 असे एकूण 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जुलै च्या दरम्यान नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असलेल्या कृष्णा अपार्टमेंट वाकीपाडा बापाणे वसई येथे बंद दरवाजाचे कुलूप तोडून तसेच घरातील बेडरूम मधील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेली रोख रक्कम चोरी करून नेल्याबाबतची तक्रार नायगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. नायगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात भादवि कलम 305(पे),331(1),331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नायगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने घटनास्थळी पाहणी करून गुन्ह्यात मिळालेले तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी हे रेकॉर्डरचे असून त्यांना वसई मधून अटक केली आहे. तिन्ही आरोपी सराईत आरोपी असून त्यांच्याविरुद्ध नायगाव आणि पवई पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल आहे. आरोपींची नावे ,सुशांत दिनेश खेडेकर (रा.दहीपाडा, बोरीवली पूर्व मुंबई),भावेश लंजी चामार (रा.भोयदापाडा वसई पूर्व ता. वसई),संदीप रामप्रसाद चौधरी (21 वर्ष) (रा.रोड वसई पूर्व ) आहे. तसेच, पोलिसांनी आरोपींकडून चोरलेली रिक्षा, आणि इतर मुद्देमाल असा एकूण एक लाख 79 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून पोलिसांना 3 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. तसेच, आरोपी सुशांत खेडेकर यांच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण सहा गुन्हे दाखल आहे.
पोलीस पथक
सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, अतिरिक्त कार्यभार परीमंडल 2 वसई, नवनाथ घोगरे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग, नायगाव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर टिळेकर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे,गणेश केकान, पोलीस हवालदार महेश पाटील,अशोक लहामटे, पोलीस अंमलदार सचिन मोहीते, सचिन खंताळ, जययंत खंडयी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, सचिन ओलेकर, अमोल माने, वैभव कांगणे यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.