Nalasopara Crime News : बेकायदेशीर भारतात वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांना नालासोपारातून अटक..
•नालासोपारा : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाची कारवाई ; भारतामध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांना अटक, अवैध मार्गाने भारतामध्ये प्रवेश
नालासोपारा :- अवैध मार्गाने भारतामध्ये प्रवेश करणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांना नालासोपारामधून अटक करण्यात आली आहे. पालघरच्या नालासोपारामध्ये या महिला वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.रिया देबा मन्ना, (30 वर्ष), (सध्या रा.महादेव नगर आचोळे, नालासोपारा पूर्व, मुळ रा. ठाणा जि. शातकीरा देश बांगलादेश),आशा हूसेन शेख, (35 वर्ष), ( सध्या रा.मोरेगाव नालासोपारा पुर्व मुळ रा. थाने कलोखा, जि.शातकीरा देश-बांग्लादेश) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांनी कारवाई करत घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीय महिलांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन संशयित महिला, ज्या बांगलादेशीय असून ते अवैधरित्या भारतामध्ये आले आहे.त्या महिला वसई बस डेपो अंबाडी रोड येथे असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांनी दोन पथक तयार करून पंचसमक्ष सापळा रचून दोन महिलांना अटक केली आहे. पोलिसांनी महिलांना नाव, पत्ता आणि कागदपत्रे विचारले असता आशा हूसेन शेख,रिया देबा मन्ना असे सांगितले असून त्या दोघीही बांगलादेशीय असल्याचे कबूल केले आहे.तसेच,अवैधरित्या भारतामध्ये प्रवेश केल्याचे कबुली दिली आहे. पोलिसांनी दोन्ही महिला आरोपींना अटक केली आहे .पासपोर्ट अधिनियम1950 कलम 3 (अ),6(अ), विदेशी नागरी कायदा 1946 चे कलम 14 अंतर्गत माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे.
पोलीस पथक
पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार , पोलीस हवालदार शेट्ये, शिंदे, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, तिवले, महिला पोलीस शिपाई पाटील व चालक पोलीस हवालदार सर्व नेम.अनै.मा.वा. प्र. कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्ठरित्या पार पाडली आहे.