Mira Road Crime News : पॅथॉलॉजी लॅब परवाना देण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ पकडले
•मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील मुख्य वैद्यकीय अधिकारी-डॉ. बिरन्ना तिन्नपा दुधभाते व त्यांचे कर्मचारी नीलेश राठोड यांना पॅथॉलॉजी परवानगी प्रकरणी लाच स्वीकारताना अटक केली आहे
मिरा रोड :- मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संलग्न असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. बिरन्ना तिन्नपा दुधभाते आणि कर्मचारी निलेश कृष्णा राठोड (34 वर्ष) चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) ठाणे यांनी ताब्यात घेतले आहे.पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यासाठी परवाना देण्याकरिता कर्मचारी यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदार यांनी मिरा रोड येथे पॅथॉलॉजी चे व्यवसाय सुरू करण्यासाठी पॅथॉलॉजी लॅब परवाना देण्याकरिता महानगरपालिकेकडे अर्ज केला होता. पॅथॉलॉजी लॅब परवाना देण्याकरिता महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाचे कर्मचारी असलेले निलेश राठोड यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. बिरन्ना तिन्नपा दुधभाते यांच्या सांगण्यावरून तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच घेण्यासाठी सांगितले होते.एसीबीने सापळा रचून राठोडला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले, त्यानंतर त्यांनी महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील कार्यालयात दुधभाटे यांच्याकडे सुपूर्द केली. आरोपीविरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष अंबिके, एसीबी ठाणे यांनी सापळा रचून कारवाई केली आहे.