Vanraj Andekar Murder Update | वनराज आंदेकर खुन प्रकरण : हत्यार पुरविणारा मुख्य आरोपी गुन्हे शाखेकडून ताब्यात
- गुन्हे शाखा युनिट-२ वपोनि प्रताप मानकर व पथकाकडून कारवाई
पुणे, दि. ८ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Vanraj Andekar Murder Update
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणी महत्वाची भूमिका बजवणाऱ्या व हत्यारे पुरविणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट-२ कडून ताब्यात घेण्यात आले. Pune Police गुन्हे उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-२ वपोनि प्रताप मानकर व पथकाने आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.
संगम संपत वाघमारे, वय 20 वर्ष, रा.आंबेगाव पठार असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
समर्थ पोलीस स्टेशन,गुन्हा रजि.नंबर 188/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1),61(2),सह आर्म अॅक्ट कलम 3(25),4(25),सह मपोका कायदा कलम 37 (1)(3)/135, सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट कलम 7 अन्वये सदर गुन्हयाचा तपास करत असतांना गुन्हयांचे तपासा दरम्यान युनिट 2 कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.प्रताप मानकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.जाधव,मोकाशी यांनी तपासा मध्ये सदर गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेला आरोपी नामे संगम संपत वाघमारे वय 20 वर्ष रा.आंबेगाव पठार पुणे यास ताब्यात घेवुन सदर गुन्हयाचे अनुषंगाने त्याचेकडे तपास करता त्याने सदर गुन्ह्यात वापरलेले पिस्टल हे गुन्हयातील पोलिस कस्टडीतील आरोपी मित्र नामे आकाश म्हस्के,अनिकेत दुधभाते यांचे सह घेवुन आल्याचे सांगितले आहे.
वनराज आंदेकर खून प्रकरणात संगम वाघमारे याने हत्यारे आणणे पुरवणे यामध्ये महत्वाची भुमिका बजावली आहे. वाघमारे याला अटक करण्यात आली असुन त्यास न्यायालयाने 11 सप्टेंबर पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.
वनराज आंदेकर खून प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 15 पुरुष आरोपी व 1 महिला आरोपी यांना अटक करण्यात आलेले असून तीन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.