Thane Tadipar News : मनाई आदेश भंग, तडीपार आरोपीला अटक
Thane Tadipar News Rabodi Police Take Action Agisnt Tadipar Person : – राबोडी पोलिसांची कारवाई, आरोपीला एक वर्षाकरिता चार जिल्ह्यात प्रवेश बंदी होती.
ठाणे :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका Lok Sabha Election जाहीर झाले आहे.तसेच राज्याच्या राजकारणातील आणि शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याकरिता पोलिसांकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे Thane CP AShutosh Dumbare यांनी शहरातील तडीपार आरोपींची यादी समोर घेऊन जे तडीपार आरोपी Tadipar Criminal आहेत ते विनापरवाना शहरांमध्ये प्रवेश करत असाल तर त्यांना त्वरित अटक करण्याच्या सूचना दिल्या आहे. ठाणेनगर पोलिसांनी मनाई आदेश भंग करणाऱ्या एका आरोपीला ठाण्याच्या अपनानगर पहिली राबोडी परिसरातून अटक केली आहे. Thane Crime News
आरोपी वसिम रफिक मकानदार इक्बाल पिंजारी (30 वर्ष) याला पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 वागळे इस्टेट यांनी ठाणे, मुंबई शहर,मुंबई उपनगर, पालघर या चार जिल्ह्यातून 10 जुन 2023 रोजी एक वर्षाकरिता हद्दपार करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. परंतु आरोपी अफसर 29 मार्च कोणाचीही परवानगी न घेता ठाणे पश्चिम च्या अपनानगर पहिली राबोडी येथे असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपी वसिम याला अटक केली आहे. राबोडी पोलीस ठाण्यात पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अफसर याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने हे करत आहे. Thane Crime News