Thane Police News : ठाणे पोलीस आयुक्तांचा ज्येष्ठ नागरिकांशी संवाद!
•”रेझींग डे” निमित्त ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ज्येष्ठ नागरिकांशी साधला संवाद आरोग्य तपासणी शिबिराचे केले प्रारंभ
ठाणे :- ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वर्गीय संपदा नाईक हॉल, भिवंडी येथे भिवंडी शहरातील एकटे राहणारे जेष्ठ नागरिकांसाठी “रेझींग डे” सप्ताह आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणीवर प्रकाशज्योत टाकण्याचे काम आयुक्तांनी केले आहे.
“रेझींग डे” निमित्त भिवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणीचे शिबिर आयोजित केले होते. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते या आरोग्य शिबिराचे प्रारंभ करण्यात आले होते. यावेळी भिवंडी शहरातील तब्बल दोनशेहून जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचे लाभ घेतला आहे. पोलीस आयुक्तांनी ज्येष्ठ नागरिकांची संवाद साधत सुरक्षतेबाबत हमी दिली आहे. अडीअडचणीसाठी सदैव पोलीस आपल्या सोबत असल्याची ग्वाही आयुक्तांनी या कार्यक्रमात दिली आहे. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग ठाणे विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2 भिवंडी मोहन दहिकर तसेच भिवंडी मधील पोलीस अधिकारी, अंमलदार आणि ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.