Sanjay Raut : मतदारांना कोणी वेश्या म्हणणाऱ्या शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचा संजय राऊत कडून समाचार

•शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि अजित पवार यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे
मुंबई :- शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय गायकवाड दोन -दोन हजार आणि मतदान विकत घेतल्याने आणि मतदारांना वेश्या बोलल्या संदर्भात विधानसभेच्या अध्यक्षांनी आणि राज्यपालांनी यावर मत व्यक्त करावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे.मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल, लोकशाहीला कोणी रखेल म्हणत असेल, संविधानाला कोणी गुलाम मानत असेल तर ते सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे आता या संदर्भात त्यांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना आमदार गायकवाड यांच्या विधानाचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. तर मते दिली म्हणजे विकत घेतले का? अजित पवार यांच्या या प्रश्नावरही संजय राऊत यांनी निशाणा साधला.
राज्याचे कृषीमंत्री मानिकराव कोकाटे यांनी सरकारवर लाडक्या बहिण योजनेचे कसे ओझे आहे, सरकारवर 2 लाख कोटींचे कर्ज झाले आहेत, यासारख्या योजनांमुळे सरकारवर कसे ओझे होते, याबद्दल भूमिका मांडली आहे. 1500 रुपये देऊन तुम्ही मते विकत घेतली. आता तुम्हाला सरकारी तिजोरीवर भार टाकणे जमत नाही. यांना राज्य चालवता येत नाही हे यावरुन स्पष्ट दिसत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पालकमंत्रीपद वाटप करणे सोपे नाही. ठाणे, रायगड, गडचिरोली, नागपूर, बीड, पुणे असे काही जिल्हे आहे जिथे पालकमंत्री नेमने हे सोपे नाही. या क्षणी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री असताना या राज्यातील जिल्ह्यांचा पालकमंत्रीपद त्यांना जाहीर करता येत नाही. प्रजासत्ताक दिन जवळ आला आहे. प्रजासत्ताकदिनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्याला मानवंदना घ्यावी लागते आणि प्रजासत्ताकदिनी सोहळ्यास उपस्थित राहावे लागते. मात्र अद्याप पालकमंत्रीपदाचे वाटप होऊ शकले नाही, आणि पालकमंत्रीपदावरुन शेवटपर्यंत तिढा सुरुच राहणार असल्याचा दावा राऊत यांनी केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर देखील राऊत यांनी निशाणा साधला. त्यांना कोणी धमक्या देत नाही. जे धमक्यांना घाबरतात त्यांनी सामाजिक जीवनात राहू नये, म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टिका केली आहे.