ACB Trap News : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण : 20 हजारांची लाच स्वीकारताना हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात

Sambhaji Nagar ACB Trap News : वाळू वाहतूक करणाऱ्या तक्रारदाराला हप्ता म्हणून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने, छत्रपती संभाजी नगरच्या वाहतूक विभागातील पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडले.
छत्रपती संभाजीनगर :- वाळू वाहतूक करणाऱ्या तक्रारदाराला छत्रपती संभाजी नगरच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या Sambhaji Nagar Gramin Police Station हद्दीतून वाहतूक करण्यासाठी हप्ता म्हणून वीस हजार रुपयांची लाच 20 Thousand Bribe प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी वाहतूक पोलीस हवालदाराला बेड्या ठोकल्या आहे. धीरज धर्मराज जाधव (50 वय,वाहतूक शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) असे पोलीसाचे नाव आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक Chhatrapati Sambhaji Nagar ACB विभागाकडून मिळालेली माहिती अशी,तक्रारदार यांची हायवा असुन छत्रपती संभाजी नगर ग्रामीण हद्दीतून वाळू वाहतूक करण्यासाठी हप्ता म्हणून महिन्याला वीस हजार रुपये द्यावे लागतील असे सांगुन पोलीस हवालदार धीरज जाधव यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी करून पंचासमक्ष लाच रक्कम 20 हजार रुपये स्वीकारली असता वाळुज एमआयडीसी रोडवर, गाडेगाव फाट्याजवळ, जस्ट पॅक इंडस्ट्रियल कंपनी समोर, रांजणगाव शिवार, तालुका पैठण, छत्रपती संभाजीनगर येथे रंगेहात पकडले असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी बिडकिन पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर, सुरेश नाईकनवरे पोलीस उप अधिक्षक ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर , यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सापळा अधिकारी- विजय वगरे, पोलीस निरीक्षक ,ला. प्र. वि छत्रपती संभाजी नगर शांतीलाल चव्हाण, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर सापळा पथक पोलीस हवालदार सिनकर, काळे, ला. प्र. वि.छत्रपती संभाजीनगर यांनी कारवाई करत लाचखोर पोलीस हवालदाराला ताब्यात घेतले आहे.