Thane Online Scam : ऑनलाइन फसवणूक, शेअर मार्केट गुंतवणूक करण्यास सांगून 27 लाखाची फसवणूक
•महिलेची 27 लाखाची फसवणूक, वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून आरोपीचा शोध
ठाणे :- ऑनलाइन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून महिलेची तब्बल 27 लाखाची फसवणूक झाल्याची घटना ठाण्यात उघड झाली आहे. महिलेने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
10 जानेवारी रोजी ते 21 फेब्रुवारी रोजी पावेतो, फिर्यादी महिला, (44 वर्षे) (रा.रघुनाथनगर, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम) यांना दोन अनोळखी मोबाईलधारक इसमांनी इंस्टाग्रामवर शेअर्स मार्केटबाबत मेसेज करून त्यात लिंक पाठविली. त्यानंतर लिंकव्दारे फिर्यादी यांना व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये ॲड करून त्यांना डिमॅट खाते उघडण्यास सांगुत त्यात गुंतवणुक केल्यास अधिक नफा मिळण्याचे अमिष दाखवून त्यांना एकुण 27 लाख रूपये रक्कम ऑनलाईन पाठविण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. या प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक आरोपींविरुध्द माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क), 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.