मुंबई

Ashish Shelar Poem : भाजपच्या नेते आमदार आशिष शेलार यांनी कवितेतून महाविकास आघाडी आणि ठाकरे गट यांच्यावर टीका

•महाविकास आघाडीच्या जागावाटपसंदर्भात आशिष शेलार यांनी कवितेतून टीका, रोहित पवार यांच्याकडून आशिष शेलार यांच्यावर पलटवार

मुंबई :- जळगावचे भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर आशिष शेलार यांनी कवितेतून महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भात टीका केली आहे. भाविका सकाळीच अनेक जागांभाळतात एकमत नसल्याने महाविकास आघाडीमध्ये नाराजीचे नाट्य चालू आहे. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता दिसत आहे. सांगलीच्या जागेवरून काँग्रेस नाराज असल्याचे दिसून येत आहे. यावर आशिष शेलार यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत शिवसेना आणि भाविकाच्या गाडीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पलटवार केला आहे.

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांचे एक्स ट्विट
तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू आघाडीच्या माळा
सांगलीची जागा कोणाला?
चल निघ काँग्रेस चहाटळा !

तुज भिवंडी, मज सातारा
उत्तर मुंबई कोणाला ?
वेड लागले नानाला
काय द्यावे ? वंचितला !

तुज मशाल, मज तुतारी
आणखी हात कोणाला ?
कोण सांगेल मीडियाला?
पोपटलाल एक नेमलेला!

खुसू खुसू, गाली हसू
वरवर अपुले रुसू रुसू
ताईंसाठी एक दिसू
बाकी जागांवर भांडत बसू!!

कशी कशी, आज अशी
गंमत घमंडीयाची पाहशी
आता कट्टी फू काँग्रेसशी?
तर मग गट्टी कोणाशी ?
—/—(श्रेष्ठ कवी भा.रा. तांबे यांची क्षमा मागून)

आमदार रोहित पवार यांचा पलटवार

आशिष शेलार साहेब,….भाजपचा एक खासदार इकडं आला म्हणून आपण लगेच उष्टं खाऊन पोट भरण्याची भाषा करणं म्हणजे #चोराच्याउलट्याबोंबा आहेत. याच भाषेत आम्ही बोललो तर मग तुम्ही आमचं उष्ट खाऊन पंगतीच्या पंगती उठवत आहात तरी तुमची भूक भागत नाही असंच म्हणावं लागेल.
असो!
होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता आपल्या मतांनी तुमच्या भ्रष्टाचारी अजीर्णावर उपचार केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0