Thane Crime News : दिवसाढवळ्या चोरट्यांनी केले घरातील दागिने साफ, लाखोंचे दागिने घेऊन चोरटे पसार

ठाण्याच्या खोपट परिसरात चोरी, सहा लाखाहून अधिक किंमतीचे दागिने चोरीला
ठाणे :- खोपट परिसरात मोठी चोरी झाली आहे. या चोरीमध्ये चोरट्याने सहा लाखावरून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे चोरट्याने घरात कोण नसल्याच्या संधीचा फायदा घेत घरातील मुख्य दाराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला आणि कपाटा मधील सहा लाख 90 हजार किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे तिथून पसार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर फिर्यादी यांनी ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
21 मे 2024 रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान फिर्यादी आशिष विठोबा पवार 43 वर्ष हे आपल्या खोपट येथील घरातून काही कामानिमित्त बाहेर गेले असता चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत दिवसाढवळ्या लाखो रुपयाचे दागिने घेऊन लंपास झाल्याचे तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात भादवी कलम 454,380 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवरे हे करत आहे.