क्राईम न्यूजमुंबई

Navi Mumbai Crime News : नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधात कारवाईचा बडगा, तरुणाला अटक, लाखोचा हेरॉइन अंमली पदार्थ जप्त

Navi Mumbai Crime News : रबाळे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई ; अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तरुणाला अंमली पदार्थ सह आवळल्या मुसक्या

नवी मुंबई :- महाराष्ट्रात ललित पाटील Lalit Patil Drug News प्रकरणानंतर अमली पदार्थ Drug Smuggling तस्करी विक्री खरेदी यांच्या विरुद्ध पोलिसांकडून कठोर कारवाईचे पाऊले गेल्या कित्येक दिवसांपासून उचलले जात आहे. महाराष्ट्र सह राज्याबाहेर मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून करोडो अब्ज रुपयाचे कारखाने पोलिसांनी उध्वस्त केले आहे. पोलिसांच्या या कामगिरीत भर पडली असून नवी मुंबई पुन्हा एकदा अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. तरुणाकडे हेरॉईन हा अंमली पदार्थ ज्याची किंमत जवळपास आठ लाखाहून अधिक असल्याचे पोलिसांना तपासात कळाले असून पोलिसांनी अंमली पदार्थ कलम अंतर्गत आरोपीला अटक केली आहे. Navi Mumbai Drug News

रबाळे पोलिसांच्या हद्दीत 20 मे 2024 रोजी अंमली पदार्थ विक्री कक्षात एक व्यक्ती अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अंमली पदार्थ विरोधी पथक धनाजी क्षीरसागर यांना मिळाली होती. अमली पदार्थ विरोधी पक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकणे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप मोरे पोलीस हवालदार रमेश तायडे पाटील पोलीस नाईक फुलकर या पथकाला सहाय्यक आयुक्ताने मार्गदर्शन करून सदर आरोपी हा साईट रेड जवळ असणाऱ्या सेक्टर 25 रबाळे नवी मुंबई येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे आरोपीचे नाव अजय दिलीप जाधव (26 वर्ष) याला अटक केली असून त्याच्याजवळ अंग झडती घेतली असता त्याच्याकडे आठ लाख 96 हजार 900 रुपये किमतीचे खडे व पावडर सारखा काळा व तपकिरी रंगाची 54.26 ग्रॅम वजनाचे हेरॉईन हा अमली पदार्थ मिळून आला आहे. पोलिसांनी अजय जाधव याच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात एन डी पी एस अधिनियमन 1985 चे कलम 8 (क),21 (ब) आडवे गुन्हा दाखल केला असून या संपूर्ण गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप मोरे हे करत आहे. Navi Mumbai Drug News

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भामरे ,पोलीस सहआयुक्त संजय येनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे ,अमित काळे यांनी नवी मुंबई नशा मुक्त करण्याचे व अमली पदार्थ सेवन विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले असून नवी मुंबई व्यसनमुक्त करण्याकरिता यांनी कारवाईचा बडगा उभारला आहे. Navi Mumbai Drug News

Web Title : “Police Crack Down on Narcotics Ring in Navi Mumbai: Millions of Rupees Seized”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0