जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज फॉरवर्ड केल्यास कारवाई
Mira Road Police take Legal Action Against Casual Religious Message : जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज फॉरवर्ड केल्यास, कायदेशीर कारवाई पोलीस आयुक्त मीरा-भाईंदर वसई विरार यांचे आदेश
मिरा रोड :- 22 जानेवारी 2024 दरम्यान मिरा रोड परिसरातील न्याय नगर भागात जातीय तेड निर्माण होऊन दोन गटांमध्ये असंतोष पसरला होता त्याची खबरदारी म्हणून पोलिसांनी सर्व उपयोजना करून परिस्थिती सध्या पूर्वपदावर आणली होती.राज्यात लोकसभेचे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे महाराष्ट्रातील मुंबई वसई विरार परिसरात पाचव्या टप्प्यात म्हणजेच 20 मे दरम्यान लोकसभेचे मतदान होणार असून चार जूनला त्याचा निकाल लागणार आहे. मी सर्व परिस्थिती पाहता पोलीस आयुक्त मीरा-भाईंदर वसई विरार मधुकर पाण्डेय, यांनी आयुक्तालयातील हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावे आणि कोणत्याही समाजात जातीत तेढ निर्माण होणार नाही याची काळजी म्हणून विशेष सूचना लागू केल्या आहेत. Mira Road Police News
मीरा-भाईंदर, – वसई, विरार पोलीस आयुक्तालय परिसरातील नागरिकांना कळविण्यात येते की मीरा-भाईंदर परिसरामध्ये दोन धर्मीयांमध्ये,
समाजामध्ये, गटामध्ये तेढ निर्माण होईल या पद्धतीने कोणत्याही प्रकारचे मेसेज मोबाईल,व्हाट्सअप, ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक युट्युब व इतर सोशल मीडियावर मेसेज तयार करून प्रसारित करेल तसेच आलेल्या मेसेजला लाईक करेल व सदर मेसेज वर कमेंट करेल व अशा कृत्यामुळे दोन वेगवेगळ्या धर्मीयांच्या, गटाच्या व समाजाच्या भावना दुखावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मेसेज तयार करणारा , प्रसारित करणारा, लाईक करणारा व त्यावर कमेंट करणारे व्यक्तींना जबाबदार धरण्यात येईल व त्यांचे वर कायद्यामधील तरतुदीनुसार भादवि कलम 143 144 145 146 147 149 188 295अ 153अ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 सी व इतर संबंधित कायद्यान्वये गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. अशा सूचना लागू करण्यात आले आहे. Mira Road Police News