क्राईम न्यूजठाणे

Thane Crime News : गुन्हे शाखा घटक-4 उल्हासनगर यांची कामगिरी ; सराईत आरोपींना केले अटक, आरोपी दिवसाढवळ्या लोकांची फसवणूक करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने करायचे लंपास

Thane Crime News Thane Crime Branch Arrested Gold Stoller Criminal : गुन्हे शाखा घटक -4, उल्हासनगर कडून ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, परिसरात बतावणी करून लोकांची फसवणूक करणारे सोन्याचे दागिने लुटणारे आरोर्पीना अटक

ठाणे :- पोलीस आयुक्तालय हद्दीत बाजाररोड, सार्वजनिक रोडवर मिळेल त्या लोकांना बोलवण्यात गुंतवून, बतावणी करून त्यांची फसवणूक करून त्यांचे अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले बाबत ठाणे पोलीस Thane Police आयुक्तालयातील नौपाडा, ठाणे उल्हासनगर, बदलापूर पूर्व, अंबरनाथ, शिवाजीनगर, विठ्ठलवाडी, महात्मा फुले चौक, डोंबिवली तसेच इतर जिल्हयात स्थानिक पोलीस ठाण्यात Thane Police News गुन्हे दाखल आहेत. Thane Crime News

गुन्हयातील अनोळखी आरोपी हे संपुर्ण ठाणे शहर तसेच आजुबाजूच्या जिल्हयात वारंवार जागा बदलून बतावणी करून लोकांची फसवणूक करून लोकांचे सोन्याचे दागिने काढून घेत होते.परंतू आरोपी हे गुन्हा करण्याची व त्यांची राहण्याची जागा वारंवार बदलत असल्याने ते मिळून येत नव्हते. Thane Crime News

याकरिता वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार उल्हासनगर क्राईम ब्रांच युनिट मध्ये अंतर्गत एक विशेष पथक तयार करून त्याचा परिमंडळ-4 उल्हासनगर परिसरातील दाखल गुन्हयाचा संमातर तपास करून सदर आरोपीत यांचे बाबतीत कोणताही सुगावा किंवा माहिती नसताना, तपास पथकातील पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे, गणेश गावडे, यांनी खात्रीशीर गुप्त बातमीदार तयार करून त्याचे मार्फतीने आरोपीचे बाबतीत खात्रीशीर माहिती काढून, रात्रौंचे वेळी छापा कारवाई करून सदर आरोपी यांना ताब्यात घेवुन त्यांची नावे पत्ते निष्पन्न केले आहे. Thane Crime News

आरोपींनी त्यांचे नावे सांगितले

1) अनिल कृष्णा शेट्टी, (43 वर्षे), रा.आयडीयल कॉलेज समोर, मलंगगड रोड, भालगांव, ता. अंबरनाथ, जि.ठाणे,

2) रमेश विजयकुमार जयस्वाल,(47 वर्षे),रा.आयडीयल कॉलेज समोर, मलंगगड रोड, भालगांव, ता. अंबरनाथ, जि.ठाणे

आरोपी यांना उल्हासनगर पोलीस ठाण्यात भा.द.वि.क. 420,34 प्रमाणे दाखल गुन्हयात अटक करण्यात आले आहे. त्याचेकडून खालील नमुद प्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत.11 ठिकाणी आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.त्या गुन्हे उघडकीस आणले असून त्यांचेकडून 17 लाख 28 हजार रक्कमेचे 240 ग्रॅम 120 मि.ग्रॅम इतके सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.अटक आरोपी यांचेकडुन मुंबई शहर, व मुंबई उप नगर येथील मुंबई शहर येथील खालील नमुद प्रमाणे एकुण 05 गुन्हे उघडकिस आणले आहेत.मुंबई शहर व उपनगर मधिल दिडोंशी, दहिसर, कांदिवली परिसरात देखील अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत. त्याबाबत अधिक तपास चालू आहे.

पोलीस पथक

Thane Police News

पोलीस आयुक्त, आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare , सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त साो, (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील, सहायक पोलीस आयुक्त साो, (शोध-1) निलेश सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली अशोक कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राजु सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक महादेव निकम, पोलीस हवालदार गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, शेखर भावेकर, योगेश बाथ, कुसूम शिंदे, विक्रम जाधव, प्रकाश पाटील, सतिष सपकाळे, विक्रम पाटील, सर्व नेमणूक गुन्हे शाखा, घटक 4, उल्हासनगर यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0