Thane Crime News : ठाणे महानगरपालिकेच्या पाच कर्मचाऱ्यांवर एसीबीची कारवाई, पदाचा गैरवापर केल्याचा आरोप
•Thane Crime News न्यायालयाने दिलेले आदेशाचा ठाणे महानगरपालिका येथील अधिकारी आणि कर्मचारी पाच जणांनी पदाचा गैरवापर करत खोटा गुन्हा दाखल केला, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांची कारवाई
ठाणे :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या ठाणे महानगरपालिकेतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.Urgent: Thane Municipal Corporation Employees Charged with Misuse of Position ठाणे महानगरपालिकेच्या पाच अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत तक्रारदार याच्यावर गुन्हा दाखल केला. पाचही अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात एसीबीने कारवाई करत अटक केली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवत पदाचा गैरवापर करत खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पाचही अधिकाऱ्यांविरुद्ध ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीवरून पाचही आरोपींवर एसीबी कडून कारवाई करत अटक करण्यात आली आहे.Thane Municipal Corporation: Where Corruption and Abuse of Power Meet ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी. मनिष दिनेशचंद्र जोशी, सचिव, सुरेश शिवलाल राजपूत, प्रभाग अधिकारी, कळवा प्रभाग समिती, रविंद्र दत्तात्रय कासार, कनिष्ठ अभियंता,बाळू हनुमंत पिचड ठा.म.पा ठाणे, मुख्य प्रशासकीय कार्यालय,मगनसिंग दानसिंग थापा तत्कालीन नेमणूक उथळसर प्रभाग समिती, सर्व नेम. ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी आहे.Controversy Uncovered: Thane Municipal Corporation Officials Accused of Misconduct
खोटे कागदपत्र सादर करणाऱ्या महानगरपालिकेच्या पाच आरोपींना एसीबी कडून अटक
न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये ठाणे महानगर पालिकेतील वर अधिकारी व कर्मचारी आणि इतर आरोपी यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कायदयामधील तरतूदीची जाणीवपुर्वक व हेतुपुरस्सर अवज्ञा करून खोटे, बनावट आणि चुकीचे दस्ताऐवज तयार केले. Direct Order from Court: Thane Municipal Corporation Officials and Employees Under Investigation तसेच, दस्ताऐवज खोटे, बनावट आणि चकीचे असल्याचे माहित असून देखील खरे म्हणून वापरुन चुकीच्या अभिलेखाची मांडणी केली व शासकीय अभिलेखात खोट्या नोंदी केल्या आहेत.Mysterious Corruption Scandal Rocks Thane Municipal Corporation सदरचे खोटे, बनावट आणि चुकीचे दस्तऐवज समान उद्देश साध्य करण्याकरीता संगनमताने कट रचून न्यायालयीन अभिलेखात पुराव्याकामी दाखल करुन कायद्याने माहिती देणे बंधनकारक असताना सुध्दा जाणीवपूर्वक खोटी माहिती देवून तक्रारदार यांना नुकसान पोहचवण्याच्या दृष्टीने आणि तक्रारदारांना खोटया गुन्हयात अडकविण्याच्या गैर उद्देशाने त्यांना कोणत्याही प्रकाराचे अधिकार नसतांना स्वतःच्या आर्थिक फायदाकरीता, पदाचा दुरुपयोग करून तक्रारदार यांचेविरूध्द खोटे पुरावे तयार केले व खोटी फिर्याद दाखल करून आरोपी यांनी गुन्हेगारी गैरवर्तन केले.Punitive Action: Thane Municipal Officers Charged with Misuse of Power ठाणे महानगरपालिकेच्या पाचही अधिकाऱ्या यांचेविरूध्य भादवि संहिता कलम 109,166,167,201,217,218,465,466,469,471,473,474,476,511 सह 34 व भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 13 (1) (अ), 13 (1) (ड), 13(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबी पथक
सुनिल लोखंडे पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.मार्गदर्शन अधिकारी गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. Current Scandal: Thane Municipal Corporation in Hot Water for Corruption Charges