
Thane ACB Trap News : ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई; तात्यासाहेब ढेरे उप आयुक्त, वस्तू व सेवा कर विभाग पालघर आणि एकनाथ पेडणेकर, खाजगी व्यक्ती टॅक्स कन्सल्टन्सी यांना एसीबीच्या बेड्या
पालघर :- संतोष इंजीनियरिंग वर्क या नावाने तयार केलेल्या उत्पादनाचे खरेदी विक्री बाबत त्यांना दंडासह आकारण्यात आलेल्या वस्तू व सेवा जीएसटी कर रक्कम कमी करून देण्याकरिता खाजगी व्यक्ती एकनाथ पेडणेकर (टॅक्स कन्सल्टन्सी) यांनी वस्तू व सेवा पालघर विभागाच्या उप आयुक्त तात्यासाहेब ढेरे यांना देण्यासाठी 15 लाख रुपयांची लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. Thane ACB Trap News तक्रारदार यांनी ठाणे एसीबी कार्यालय येथे खाजगी व्यक्ती आणि जीएसटी उपायुक्त यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. Thane ACB Bribe News लाचेची रक्कम स्वीकारल्या बाबत एसीबी कडे खाजगी व्यक्ती आणि उपायुक्त यांनी मान्य केल्याचे एसीबीने म्हटले आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,यातील तक्रारदार यांनी केलेले तक्रारीवरून दिनांक 28 फेब्रुवारी 25 रोजी केलेल्या तक्रारी वरुन एसीबीने 8 मार्च 2025 रोजी पडताळणीमध्ये तात्यासाहेब ढेरे, उप आयुक्त, वस्तू व सेवा कर विभाग आणि खाजगी व्यक्ती एकनाथ पेडणेकर, (टॅक्स कन्सल्टन्सी) यांनी तक्रारदार यांचे “संतोष इंजीनियरिंग वर्क” या नावाने तयार केलेल्या उत्पादनाचे खरेदी विक्री बाबत त्यांना दंडासह आकारण्यात आलेल्या वस्तू व सेवा (जीएसटी) कर रक्कम कमी करून देण्याकरता खाजगी व्यक्ती पेडणेकर यांनी 15 लाख रूपये तात्यासाहेब ढेरे, उप आयुक्त, वस्तु व सेवा कर, पालघर विभाग यांचेकरिता मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच,तात्यासाहेब ढेरे यांनी सहमती दर्शवली होती. Palghar Latest Crime News
एसीबीने त्यानुसार 9 मार्च 2025 रोजी सापळा रचून तात्यासाहेब ढेरे, उप आयुक्त, वस्तु व सेवा कर विभाग, पालघर व खाजगी व्यक्ती पेंडणेकर यांनी तक्रारदार यांना अंधेरी येथिल खाजगी व्यक्ती पेडणेकर यांचे ऑफिस बाजुस असलेल्या चीमतपाडा रोड येथील अनिरुद्ध हॉटेल येथे तक्रारदार यांना त्या ठिकाणी बोलावले होते. लाचेची रक्कम 15 लाख रुपये लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष खासगी व्यक्ती एकनाथ पेडणेकर, टॅक्स कंसल्टतन्सी यांनी हॉटेल मधील टेबल चे खालील बाजुस ठेवण्यास सांगितली . प्रकारास तात्यासाहेब ढेरे, उप आयुक्त, वस्तु व सेवा कर विभाग, पालघर यांनी समक्ष सहमती दर्शवून ते सदर ठिकाणावरून निघुन गेल्याने खाजगी व्यक्ती पेडणेकर यांना 15 लाखा रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले आहे.उप आयुक्त (जीएसटी, पालघर विभाग) यांचा एसीबी कडून शोध घेतला जात आहे.
एसीबी पथक
शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.संजय गोवीलकर, अपर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. सुहास शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली रूपाली पोळ पोलीस निरीक्षक लाप्रवि ठाणे.सापळा पथक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाजगे, पोलीस हवालदार रुपेश पाटील महिला पोलीस हवालदार आश्र्विनी राजपूत, महिला पोलीस हवालदार राखी शिंदे पोलीस उपनिरीक्षक चौधरी पोलीस शिपाई अमोल भुजबळ यांनी कारवाई केली आहे.