मुंबई
Mumbai Crime News : ५० रुपयांसाठी तलाठी निलंबित
मुंबई (महाराष्ट्र मिरर) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी एका तलाठ्याने ५० रुपयांची मागणी केली. ५० रुपयांची मागणी करणाऱ्या तलाठ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठ्यावर निलंबनाची कारवाई केली.
तुळशीराम महादेव कंठाळे (वय ५५) असे निलंबित करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. तुळशीराम कंठाळे हा तलाठी गरजू महिलांकडून उत्पन्नाच्या दाखल्यासाठी ५० रुपये घेत होता. हा व्हिडीओ एका जागरूक तरुणाने सोशल मीडियावर व्हायरल केला.