ठाणेक्राईम न्यूज

Thane Crime News : “50000 Bounty on Fugitive Gangster: Thane Police Nabs Him with Help from UP Task Force”

कुख्यात गुंडा मुंब्रातुन ताब्यात ; आरोपीवर उत्तर प्रदेश सरकारने पन्नास हजाराचे बक्षीस जाहीर

ठाणे गुन्हे शाखा कक्ष-1 उत्कृष्ट कामगिरी ; उत्तर प्रदेश सरकारने पन्नास हजार बक्षीस जाहीर केलेला आरोपीला मुंब्रातुन केले अटक

ठाणे :- उत्तर प्रदेश सरकारने पन्नास हजार रुपये जाहीर केलेल्या कुख्यात गुंड्याला मुंब्रातून‌ अटक केली आहे. ठाणे गुन्हे शाखा घटक -1 पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे उत्तर प्रदेश राज्यातून फरार आरोपीला ठाण्याच्या मुंबईतून अटक केली आहे. आरोपीवर उत्तर प्रदेशातील हाफिस गंज पोलीस ठाण्यात भादवि कलम 3/5A/8 मधील आरोपी समीर तूफेल कुरेशी (25 वर्ष) प्रमाणे गुन्हे दाखल असून तो गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश मधून फरार होता. हे आरोपीला शोधण्याकरिता उत्तर प्रदेश सरकारने त्याच्याविरुद्ध पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

लखनऊ पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर आरोपी हा मुंब्रा परिसरात राहत असल्याची बातमी कळली होती. त्या अनुषंगाने‌ पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ व पोलीस हवालदार दीपक जाधव यांना माहितीच्या आधारे आरोपी हा राजू याचे दुकान शिमला पार्क मुंबई येथे राहत असल्याचे बातमीदार मार्फत माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी स्पेशल टास्क फोर्स लखनऊ यांच्या मदतीने आरोपीला झेल बंद केले तसेच आरोपीच्या विरोधात जवळपास आठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्या विरोधात धमकी, खंडणी, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या शस्त्र बाळगणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या उत्तर प्रदेश मधील आरोपीला पकडून देण्यास गुन्हे शाखा घटक -1 यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0