क्राईम न्यूजमुंबई

MK Madhvi Arrested : ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकास ठाणे खंडणी विरोधी पथकाकडुन अटक

MK Madhvi Arrested In Extortion : खंडणी मागणाऱ्या नवी मुंबई महानगर पालिकेच्या माजी नगरसेवकास खंडणी विरोधी पथक, ठाणे यांच्याकडून अटक

ठाणे :- नवी मुंबईत Navi Mumbai ऐरोलीतील माजी नगरसेवक Ex corporater आणि उध्दव ठाकरे Uddhav Thackeray गटाचे पदाधिकारी एम. के. मढवी MK Madhvi Arrested यांना अटक झाली आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाने Thane Extortion Squad एम के मढवी यांना अटक केली आहे.

26 एप्रिल ठाणे पोलिस आयुक्तालयातील खंडणी विरोधी पथक, Thane Extortion Squad गुन्हे शाखा, ठाणे येथे तक्रारदार त्रिभुवन लालबीहारी सिंग (42 वर्ष) रा. वाघोबानगर कळवा ठाणे यांना एका कपंनीने एरोली परिसरात खोदकाम करून इंटरनेट केबल टाकण्याचे कॉन्ट्रक्ट दिले होते. खोदकाम सुरू असताना ऐरोली, नवी मुंबई परिसरातील माजी नगरसेवक एम. के. मढवी यांनी त्रिभुवन सिंग यांना त्यांचे ऑफीसमध्ये बोलावुन तसेच तक्रारदार त्यांच्या कळवा येथील घरी असताना वारंवार फोन करून ते तेथील नगरसेवक असुन 2 लाख 50 हजार रूपयांची खंडणी मागणी करून पैसे न दिल्यास काम बंद पाडण्याची धमकी दिली. त्या अनुषंगाने त्यांचे आपसात वेळोवेळी झालेले संभाषण त्रिभुवन लालबीहारी सिंग यांनी त्यांचे मोबाईल फोन द्वारे रेकॉर्ड केले. तसेच दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी अडीच लाखापैकी दीड लाख रूपये आरोपी मढवी हे तक्राररदार यांच्याकडून घेत असतानाचा व्हीडीओ रेकॉर्ड करून तक्रारदार त्याच दिवशी 26 एप्रिल 2024 रोजी खंडणी विरोधी पथक येथे तक्रार केली. MK Madhvi Arrested In Extortion

नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 5 मध्ये असलेल्या कार्यालयातून एम के मढवी यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. ठेकेदाराला 2.5 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी एम के मढवी यांना अटक करण्यात आली आहे. एम के मढवी यांना ठाण्यातील खंडणी विरोधी शाखेत नेण्यात आले. सापळा दरम्यान आरोपी नगरसेवक एम. के. माढवी यांनी तक्रारदार त्रिभूवन सिंग यांच्याकडील एक लाख रूपये त्यांचा ड्रायव्हर अनिल सिताराम मोरे, (49 वर्ष) यांच्या मार्फतीने पक्ष कार्यालयात स्वीकारले आहेत. या कारवाईदरम्यान पोलिस पथकाने माजी नगरसेवक मनोहर कृष्ण मढवी, (64 वर्ष), रा.घोटीवली गाव, नगरसेवक, नवी मुंबई महानगरपालिका यांना तसेच त्यांचा चालक अनिल सिताराम मोरे, (49 वर्ष) रा. घोटीवली गाव यांना ताब्यात घेतले आहे. MK Madhvi Arrested In Extortion

तसेच दोन्ही आरोपी यांच्या विरोधात कळवा पोलिस ठाणे येथे भा.दं.वि. कायदा कलम 384,385,387,506,506 (2),34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. सदरचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे करीत आहेत. MK Madhvi Arrested In Extortion

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0