महाराष्ट्रमुंबई

Tejasvee Ghosalkar : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर इंस्टाग्रामवर पोस्ट

Tejasvee Abhishek Ghosalkar  Demand Security : तेजस्वी घोसाळकर संरक्षणाची पुन्हा एकदा केली मागणी

मुंबई :- माझ्याही जीवाला धोका असताना मला साधे पोलिस संरक्षण Mumbai Police देखील देण्यात आलेले नाही. मात्र सलमान खानच्या घाबाहेर गोळीबार झाल्यावर संपूर्ण पोलिस यंत्रणा कामाला लागली अशी उद्विग्न पोस्ट Tejasvee Ghosalkar Post माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी केली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपली व्यथा मांडत प्रश्न उपस्थित केले आहेत.

अभिषेक यांच्या हत्येच्या केसकडे पोलिसांचे दुर्लक्ष या पोस्टमध्ये त्यांनी म्हंटले आहे की, “सलमान खानच्या घराबाहेर हवेत गोळीबार झाला तर मुंबई पोलिसांची सगळी यंत्रणा कामाला लागली. परंतु अभिषेक यांच्या हत्येचा केसचा उलगडा करण्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. माझ्याही जीवाला धोका असतानाही पोलिसांकडून मला कुठलेही संरक्षण दिले गेले नाही. मला सलमान खानसारखे संरक्षण का दिले गेले नाही? जर सिस्टीम एखाद्या सेलिब्रिटीची सुरक्षा मजबूत करण्यासाठी रॅली करू शकते, तर मला संभाव्य हानीसाठी असुरक्षित का ठेवले जाते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत नाही तसेच प्रशासनाकडून मिळणारी ही वागणूक म्हणजे न्याय व्यवस्थेबद्दल चिंता निर्माण करणारी आहे. एखाद्या व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठता न पाहता सर्व नागरिकांना संरक्षण देणे हे आवश्यक आहे असे तेजस्वी यांनी म्हंटले आहे. तसेच मी विधवा असताना मला सुरक्षा का दिली जात नाही? असा सवाल करत घोसाळकर यांच्या हत्येचा आजतागायत योग्य तपास झालेला नाही. राज्य सरकार कोणत्याही प्रकारची मदत करत नसल्याचा आरोप घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी यांनी केला आहे.

कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?

तेजस्वी घोसाळकर या दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक होते. काही महिन्यांपूर्वी अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर त्यांना गंभीर जखमी अवस्थेतल्या अभिषेक घोसाळकरांना दहिसरच्या करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नोरोन्हा यानंही स्वतःवर गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे मॉरिस भाई आणि अभिषेक घोसाळकर हे फेसबुक लाईव्ह करत होते. फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर मॉरिसनं अभिषेक घोसाळकरांवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0