क्रीडा

Sports News : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून विराट कोहली बाहेर!

•भारताचा फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्ध नागपुरात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा किंग कोहली का आऊट झाला

IND vs ENG 1st ODI :- भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात दोन्ही संघ नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आमनेसामने आहेत. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. याच सामन्यात विराट कोहली टीम इंडियाचा भाग नाही. चला तर मग जाणून घेऊया विराट कोहली नागपूर वनडेत का खेळत नाहीये.

टॉसच्या वेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनची घोषणा करताना सांगितले की, विराट कोहली या सामन्यात टीम इंडियाचा भाग नाही.किंग कोहलीने न खेळण्याचे कारण स्पष्ट करताना रोहितने सांगितले की, काल रात्री त्याला गुडघ्याचा त्रास झाला होता, त्यामुळे तो या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. आता या सामन्यात विराट कोहलीच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भारताचे प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

इंग्लंडचे प्लेइंग इलेव्हन

बेन डकेट, फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0