महाराष्ट्र
Trending

Team India : विजेता भारत! ट्रॉफीसोबत टीम इंडियाचा जल्लोष; पाहा अहमदाबादमधील ऐतिहासिक क्षणांची ‘फोटो गॅलरी’

IND won T20 World Cup by 96 Runs against NZ :- अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल (8 मार्च) भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. विजयानंतर मैदानावर खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या ऐतिहासिक सेलिब्रेशनचे काही खास क्षण आहेत.

ऐतिहासिक ट्रॉफी आणि टीम इंडिया

विजयानंतर बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या हस्ते कर्णधार सूर्यकुमार यादवने चकाकती ट्रॉफी स्वीकारली. संपूर्ण संघाने मंचावर एकत्र येत ‘चॅम्पियन्स’च्या बॅनरखाली ही ट्रॉफी उंचावली आणि फटाक्यांच्या आतषबाजीत एकच जल्लोष केला.

तिरंग्यासह मैदानावर ‘व्हिक्टरी लॅप’

विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी खेळाडूंनी हातात तिरंगा घेऊन संपूर्ण मैदानाला प्रदक्षिणा घातली. सव्वा लाख चाहत्यांच्या ‘इंडिया.. इंडिया’ या जयघोषात सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह चाहत्यांचे आभार मानताना दिसले.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button