Pune Police News : मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटकच; वानवडी पोलिसांची कामगिरी

Wanwadi Police Arrested Snake Smuggler : महंमद कामराण अब्दुल करीम आणि मिथुन शेट्टीबा मंजुळे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत
पुणे :- मांडूळ जातीच्या सापाची तस्करी Pune Snake Smuggling करणाऱ्या दोन जणांना वानवडी पोलिसांच्या पथकाने Wanwadi Police News साईबाबा मंदिर चौक, जगताप चौक, वानवडी पुणे येथून अटक केली आहे.मांडूळ असून त्यांची किंमत दहा लाख रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महंमद कामराण अब्दुल करीम (वय 30 रा. गुलबर्गा, हागरगा क्रॉस, झमझम कॉलणी, नसीरिया मश्जिद जवळ, कर्नाटक राज्य,) आणि मिथुन शेट्टीबा मंजुळे (वय 30 रा. विद्यानगर ता. निलंगा जि. लातुर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर हद्दीत कोंबीग ऑपरेशन व अवैध धंदयावर कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे, सहायक पोलीस उप निरीक्षक रमेश साबळे, पोलीस अमंलदार सर्फराज देशमुख, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, संदिप साळवे असे वानवडी पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार संदिप साळवे व सर्फराज देशमुख यांना त्यांचे बातमीदार मार्फत बातमी मिळाली की दोन व्यक्ती हे मांडूळ जातीचे साप (वन्यप्राणी) घेवुन विक्री करण्यासाठी साईबाबा मंदिर चौक, जगताप चौक, वानवडी पुणे येथे येणार आहेत.तेथे सापळा लावला. दोन व्यक्ती येताना दिसले व त्यापैकी एकाचे हातात लाल व काळे रंगाची बॅग दिसली. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता एक रेडसन जातीचे मांडुळ हा साप (वन्यजीव प्राणी) मिळुन आला. व तो वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा 1972 अंतर्गत शेडयुल 3 मधील प्रतिबंधीत मांडुळ जातीचे साप असल्याची खात्री झाल्याने पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे यांनी पंचांचे उपस्थितीत सविस्तर पंचनाम्याने ताब्यात घेवुन वरील आरोपी विरुध्द वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा 1972 चे कलम 2(16),9,44(1) (सी) प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आलेला आहे. रेडसन जातीचे मांडुळ साप हे संचालक, वन्य प्राणी संग्राहालय, बावधान, पुणे याचे ताब्यात संरक्षणार्थ देण्यात आले आहे.