मुंबई
Trending

Uddhav Thackeray : मी उद्धव ठाकरेंना विनंती करतो की…’, अमित शहांनी CAA कायद्यावर काही बोलू नका

नवी दिल्ली :- गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांनी सीएएच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackery यांना धारेवर धरले आहे. अमित शाह म्हणाले, ‘माझी उद्धवजींना विनंती आहे की त्यांनी आधी कायद्याची (सीएए) गरज आहे की नाही हे स्पष्ट करावे. कायदा येऊ नये असे उद्धवजी म्हणू शकतात का? मी त्यांना आवाहन करतो की, त्यांनी देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेला हे स्पष्ट करावे की CAA होऊ नये. हिंदू शरणार्थी आणि बौद्ध निर्वासितांना नागरिकत्व मिळू नये.अमित शहा पुढे म्हणाले, त्यांना अल्पसंख्याकांच्या मतांची गरज आहे, त्यामुळेच आज उद्धव ठाकरे तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत. आम्ही नाही. आमची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. भारताच्या विभाजित भागातून आलेले निर्वासित. धार्मिक छळामुळे या तीन देशांतून आलेल्या अल्पसंख्याकांना या देशाचे नागरिकत्व दिले पाहिजे. Uddhav Thackery On Amit Shah

पश्चिम बंगालमध्येही लवकरच भाजपचे सरकार

अमित शहा Amit Shah यांनी यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही टीका केली. राजकारण करण्यासाठी खूप सारे मार्ग असल्याचे मी ममता बॅनर्जीना हात जोडून सांगतो. ममतांनी बांगलादेशातून आलेल्या बंगाली हिंदूंचे अहित करू नये. केंद्राने बंगाली हिंदूंना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आणला आहे. पण ममता बॅनर्जी हिंदू – मुस्लिम यांच्यात विसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला त्यांनी या कायद्यातील नागरिकत्व हिरावून घेणारी एखादी तरतूद दाखवून द्यावी, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमध्येही भाजपचे सरकार लवकरच येणार असल्याचे सांगितले. Uddhav Thackery On Amit Shah

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0