मुंबई

Vasai News : कळंब समुद्रकिनारी रहस्यमय कंटेनर!

•वसईच्या समुद्रकिनाऱ्यावर अचानक मोठा कंटेनर आढळल्याने खळबळ; पोलिसांचा तपास सुरू

वसई :- वसई पश्चिमेतील कळंब समुद्रकिनारी मंगळवारी सकाळी एक मोठा कंटेनर वाहून येताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्रभात फेरीसाठी आलेल्या नागरिकांनी या कंटेनरवर पहिल्यांदा लक्ष दिलं आणि तत्काळ नालासोपारा पोलिसांना याबाबत माहिती दिली.

हा कंटेनर समुद्रकिनाऱ्यावर आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच, नागरिकांनी कळंब समुद्रकिनाऱ्याकडे मोठ्या प्रमाणावर धाव घेतली. कंटेनरचं रहस्य नेमकं काय आहे, याचा तपास सुरू झाला आहे.

पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, कंटेनर किनाऱ्यावरून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तो बंदिस्त अवस्थेत आढळून आल्यामुळे आत काय आहे याबाबत नागरिकांत उत्सुकता आणि भीती दोन्हीच आहे.

“हा कंटेनर एखाद्या मालवाहू जहाजातून पाण्यात पडला असावा,” असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, तो मुद्दाम येथे सोडण्यात आला का, आत कुठले रसायन वा साहित्य आहे का, हे जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी बंदोबस्त वाढवला आहे.

कळंब समुद्रकिनारा हे पर्यटनासाठी लोकप्रिय स्थळ असून, समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षिततेबाबत या घटनेनंतर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलीस प्रशासन, नौदल आणि सीमाशुल्क यंत्रणा या प्रकरणाचा बारकाईने तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0