Mumbai News :मुंबई : बॉम्बे टाइम्स फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक केल्यामुळे मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका होत आहे. या टीकेला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिलं आहे. ग्रामीण महिलांना न्याय मिळावा, त्यांच्या कष्टाला आणि कलेला ओळख मिळावी, यासाठी आपण रॅम्पवॉक केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.https://maharashtramirror.com/ Mumbai news
पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी गेल्या 22 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे. ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करताना महिलांना रोजगार आणि त्यांच्या कामाला योग्य व्यासपीठ मिळावं, ही माझी भूमिका आहे. जालन्यातील महिलांच्या साड्यांचा स्टॉल बॉम्बे टाइम्स फॅशन वीकमध्ये लागणं ही मोठी गोष्ट आहे. अनेक सेलिब्रिटींनी या स्टॉलला भेट देऊन जालना सिल्कची माहिती घेतली.”https://maharashtramirror.com/ Mumbai news
पुढे त्या म्हणाल्या, “मी या महिलांसाठी रॅम्पवॉक केला. मला त्याची काही हौस नाही. या टीकेला उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. मात्र, त्या महिलांसाठी पुन्हा रॅम्पवॉक करावा लागला, तर मी नक्की करेन. माझ्या जालन्यातील महिलेची साडी मुंबईतील महिला विकत घेत असेल, तर त्याचा पैसा त्या महिलेला मिळणार आहे.”
जालना सिल्कला प्रोत्साहन देण्यासाठी ‘जालनाई’ हा ब्रँड लॉन्च केल्याची माहितीही त्यांनी दिली. महिलांना रोजगार मिळावा आणि स्थानिक लूम्सना बळ मिळावं, यासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुंदर वस्त्र तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन पार्थ पवार यांच्याबाबत तक्रार केल्याच्या चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “ज्या दोन व्यक्तींची भेट झाली, तेच याबाबत सांगू शकतील. यावर बोलणं मला उचित वाटत नाही,” असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.


