Thane Crime News : Drugs News | अंमली पदार्थांची आणि गावठी पिस्टल (बंदूक) तस्करी करणारे दोघे जाळ्यात; ठाणे, गुन्हे शाखा कक्ष-1 पथकाची कारवाई

•Two smugglers of narcotics and pistol (gun) in Custody ठाणे गुन्हे शाखा कक्ष-1 यांनी मुंब्रा बायपास परिसरात कारवाई करून लाखो रुपयांचा अंमली पदार्थ पकडला आहे. तसेच, पोलिसांनी आरोपींकडून गावठी पिस्टल (बंदूक) ही जप्त करण्यात आली आहे.
ठाणे :- ठाणे गुन्हे शाखा कक्ष-1 च्या पथकाने मुंब्रा बायपास परिसरात कारवाई करून लाखो रुपयांचा अंमली पदार्थ पकडला आहे. Thane Crime News तसेच पोलिसांनी आरोपींकडून गावठी पिस्टल (बंदूक) जप्त केले आहे.या कारवाईत पोलिसांनी एमडी अंमली पदार्थ पकडला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
रमजान खान माणिक सोनवणे (23 वर्ष, रा. चेंबूर, मुंबई) व उमेश अनिल अहिरे (25 वर्ष, रा. कळवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मुंब्रा पोलीस ठाण्यात सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपींविरूध्द एन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8 (क), 22 (क) सह शस्त्र अधिनियम कायदा कलम 3,25 सह म.पो.कायदा कलम 37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपींना यांना अटक करण्यात आली आहे.
शहरात अंमली पदार्थ तस्कारांचा वावर वाढल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. Thane Crime News या अंमली पदार्थ तस्कारांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. ठाणे गुन्हे शाखा कक्ष-1 चे पोलिसांना मिळालेला माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षण सूर्यवंशी,सहाय्यक पोलीस निरीक्षक फराटे आणि त्यांच्या पथकाला आत्माराम पाटील विसर्जन घाट समोर मुंब्रा बायपास ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर दोन व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही अटक केली असून त्यांच्या जवळून पोलिसांना एमडी अंमली पदार्थ, गावठी पिस्टल, 2 जिवंत काडतुसे, मोबाईल फोन असा ऐकून 3 लाख 5 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच अंमली पदार्थ आणि बंदूक विक्रीसाठी आल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी हे करीत आहे.