क्राईम न्यूजमुंबई
Trending

Fake Visa Migrants : बनावट व्हीसा व पासपोर्ट कागदपत्राच्या आधारे भारतात अवैधरित्या वास्तव्य करणा-या 03 नायझेरीयन नागरीकांना अटक

Mira Road Kashigaon Police Arrested Illegal Migrants : बांगलादेशी नागरिकांनंतर अवैधरित्या राहणाऱ्या नायझेरियन नागरिकांना काशीगांव पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा व दहशतवाद विरोधी पथकाला अटक करण्यात यश

मिरारोड :- मुंबईनंतर मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस Vasai Virar Police आयुक्तालयाच्या हद्दीत काशिगांव पोलिसांनी बेकायदेशीर स्थलांतरितांची ओळख पटवण्यासाठी केलेल्या विशेष मोहिमेदरम्यान तीन नायझेरियन नागरिकांना अटक करण्यात आली. Mira Road Kashigaon Police Arrested Illegal Migrants मीरा रोडच्या काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या नायझेरियन नागरिकांना अटक करण्यात दहशतवादी विरोधी पथक आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गौरव इक्सलंन्सी बिल्डींग नं. 2 हाटकेश काशिगाव मिरारोड येथे गेल्यावर नायजेरीयन नागरीकांना भाडेतत्वार रुम देणारा इस्टेट एजेंट साबु शौकत अली यांना पोलीस उपनिरीक्षक विजय साठे यांनी बिल्डींग खाली बोलावुन त्यांना पोलीस उपनिरीक्षक अभिजीत लांडे यांनी सांगितले की, बिल्डींग मध्ये राहत असलेले नायजेरीयन देशाचे नागरीक यांची भेट घेवून त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणे आहे. नायजेरियन नागरीक बिल्डींगमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नावे पुढीलप्रमाणे आहेत. OBINWA VINCENT,ओबिन्या विनसेन्ट (रा. गौरव इक्सीलंन्सी हटकेश काशिगाव मिरारोड पु. नायजेरीया देश), VZOR JAMES WISDOM विजोर जेम्स विस्डम (रा. गौरव इक्सीलेन्सी हटकेश काशिगाय मिरारोड पु. मुळ रा. नायजेरीया देश) महीला AYASINA MIRIAM TAIYE अयसीना मीरीयम ताय (रा.गौरव इक्सीलेन्सी हटकेश काशिगाव मिरारोड पु मुळ रा. नायजेरीया देश) हे मिळून आले आहे.त्यांच्याकडे असलेले पासपोर्ट व व्हीसा इत्यादी कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यांचे पासपोर्ट व व्हीसा त्यांनी भारतात वास्तव्य करण्या करीता बनावट तयार केले असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.नायजेरियन देशाच्या विदेशी नागरीकांना ताब्यात घेवुन त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता चे कलम 318(4),336 (2), (3),338 सह परकीय नागरीक अधिनीयम कलम 14(अ), (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सचिन शेंडगे व पोलीस शिपाई सुनिल ठाकुर हे करत आहे.

पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ -1, डॉ. विजय मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरा रोड विभाग, महेश तोगरवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काशिगांव पोलीस स्टेशन, अभिजीत लांडे, राणा परदेशी, पोलीस उप निरीक्षक, गुन्हे प्रकटीकरण शाखा, विजय साठे, पोलीस उप निरीक्षक, बिट अधिकारी हटकेश बिट, सचिन शेंडगे, पोलीस उप निरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पोलीस हवालदार प्रताप पांचुदे, पोलीस शिपाई विक्रांत खंदारे, उमंग चौधरी, किरण विरकर, टोबर,रविंद्र सोनावणे,नामदेव देवकाते, आभिषेक मढावी,सुनिल ठाकुर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0