Swachh Survekshan 2024 : जागतिक हास्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात स्वच्छतेचा जागर
Swachh Survekshan 2024 लोकसभा निवडणूकीत मतदानाचेही आवाहन
नवी मुंबई :- स्वच्छ सर्वेक्षण 2024 Swachh Survekshan 2024 अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात असून या माध्यमातून लोकांच्या मनात स्वच्छता संदेश रूजविला जात आहे. याकरिता वैशिष्ट्यपूर्ण दिवशी स्वच्छताविषयक नानविध उपक्रम राबविले जात आहे.
असाच एक अभिनव उपक्रम जागतिक हास्य दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका आणि सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूळ सेक्टर 26 येथील बहुचर्चित ज्वेल ऑफ नवी मुंबई या शहरातील आकर्षणस्थळी सकाळी 7 वाजता अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला.
याप्रसंगी स्वच्छ नवी मुंबई मिशनचा युथ Swachh Survekshan 2024 आयकॉन विक्रमवीर सागरी जलतरणपटू श्री. शुभम वनमाळी, समाजविकास विभागाचे सहा. आयुक्त श्री. किसनराव पलांडे, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल, उप पोलीस निरीक्षक श्री. विशाल माने तसेच महापालिकेचे स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि बँकेचे मार्केटिंग टीम प्रतिनिधी श्री. शुभम जाधव व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपले नवी मुंबई शहर स्वच्छतेत Swachh Survekshan 2024 अग्रणी असून स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातील ओला व सुका कचरा दररोज न चुकता घरातूनच वर्गीकरण करून कचरा गाड्यांमध्येही वेगवेगळा दिला जाईल याची काळजी घ्यावी व यामध्ये खंड पडू देऊ नये असे आवाहन यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी केले. त्याचप्रमाणे प्लास्टिकचे पर्यावरणावर व मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सांगत त्यांनी प्लास्टिक पिशव्या वापरास नागरिकांनी नकार द्यावा व कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन केले. यावेळी त्यांच्या व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते उपस्थितांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
स्वच्छतेचा Swachh Survekshan 2024 युथ आयकॉन जलतरणपटू श्री. शुभम वनमाळी यांनीही याप्रसंगी घरातील व परिसरातील स्वच्छतेचे महत्व सांगत यादृष्टीने एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी मोठी असल्याचे सांगितले. आपण घरातूनच कचरा वेगवेगळा केला तर घनकचरा प्रकल्पस्थळी आपल्या स्वच्छतामित्रांना तो वेगळा करण्यासाठी स्वतंत्र कष्ट करावे लागणार नाहीत याची आपण जाणीव ठेवली पाहिजे असे सांगत श्री. शुभम वनमाळी यांनी यादृष्टीने आम्हां युवकांची जबाबदारी मोठी असल्याचे मत मांडले. युवकांनी आपल्या सोसायटी, वसाहतीमध्ये कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहीजे असे त्यांनी सांगितले.
यावेळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेतील लोकप्रिय कलावंत श्री. कुणाल मेश्राम यांनी उपस्थितांशी एकपात्री संवाद साधत स्वच्छतेचे दैनंदिन जीवनातील महत्व हसत खेळत पटवून दिले. महिमा ग्रुपच्या सदस्यांनीही सादरीकरण करून उपस्थितांना हसविले.
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी ‘माझी वसुंधरा’ अभियानाची सामूहिक शपथ ग्रहण केली. याप्रसंगी घरापासूनच कचरा वर्गीकरण केला पाहीजे हा संदेश ओलू, सुकू आणि घातकू या अनुक्रमे ओला, Swachh Survekshan 2024 सुका व घरगुती घातक कचरा यांच्या प्रतिकरूपातील मॅस्कॉटमार्फत अभिनव पध्दतीने पटवून देण्यात आला. या 3 मॅस्कॉटप्रमाणेच सफाईमित्र आणि टॉयलेट वापरा हा संदेश देणा-या एकूण 5 मॅस्कॉट्ससोबत अनेकांनी सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. जागतिक हास्य दिनाच्या कार्यक्रमाला स्वच्छतेची जोड दिल्याने नियमित स्वच्छता राहिली तर प्रत्येकाच्या चेह-यावर कायम आरोग्यपूर्ण हास्य विलसत राहील हा संदेश या कार्यक्रमाने दिला.
यावेळी 20 मे रोजी होणा-या ठाणे लोकसभा निवडणूकीत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा अधिकार बजावावा असाही संदेश अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी प्रसारित केला. याठिकाणी मतदार जनजागृतीपर फलक तसेच स्टँडी प्रदर्शित करण्यात आले होते.