मुंबई

Subhash Dandekar Passed Away : मराठी इंडस्ट्रीला प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या कॅमलिनचे संस्थापक यांचे निधन

•Camlin Founder Subhash Dandekar Passed Away उच्च दर्जाच्या चित्रकला साहित्याच्या निर्मितीत कॅमलिनला अग्रगण्य नावात रूपांतरित करण्यात दांडेकर यांचा मोलाचा वाटा होता.

मुंबई : (15 जुलै) सुभाष दांडेकर, ज्यांना दादासाहेब दिगंबर दांडेकर म्हणूनही ओळखले जाते, कॅमलिन फाईन सायन्सचे संस्थापक आणि स्टेशनरी उत्पादक कोकुयो कॅमलिनचे अध्यक्ष एमेरिटस, यांचे सोमवारी आजारपणामुळे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा आशिष आणि मुलगी अनघा असा परिवार आहे. दांडेकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि हिंदुजा रुग्णालयात त्यांचे निधन झाले. दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या अंत्यसंस्काराला कुटुंबातील सदस्य, कॅमलिन ग्रुपचे कर्मचारी आणि उद्योगातील मान्यवर उपस्थित होते.

मराठी उद्योग जगतात नावलौकिक मिळवून देणारे आजोबा राज्याने गमावले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “त्यानी रोजगार देऊन हजारो तरुणांच्या जीवनात रंग भरला. मूल्यांच्या जपणुकीला त्यांनी मोठे प्राधान्य दिले… श्रमाला प्रतिष्ठा मिळावी, असा त्यांचा नेहमीच आग्रह होता,” ते म्हणाले. दांडेकर हे सामाजिक भान, कला आणि उद्योजकतेतील योगदानासाठी प्रसिद्ध होते. त्यांना गेम चेंजर्स ऑफ महाराष्ट्र पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले.

राज ठाकरे यांनी व्यक्त केले दुःख

कॅम्लिन’ च्या सुभाषजी दांडेकरांचं काल(15 जुलै )निधन झालं. सुभाषजी दांडेकर आणि कॅम्लिनशी या दोहोंशी माझा जुना ऋणानुबंध. माझा ‘कॅम्लिन’शी संबंध पहिल्यांदा आला, तो कॅम्लिनच्या कंपास पेटीमुळे. त्याकाळात उंटाची नाममुद्रा असलेली कॅम्लिनची आखीवरेखीव कंपासपेटी सगळ्यांकडेच असायची. कॅम्लिन सोडून दुसऱ्या कंपास पेटीचा विचारच करता येत नव्हता. फुटपट्टी, खोडरबर ते पेन्सिलपर्यंत प्रत्येक गोष्ट कॅम्लिनचीच असायची. पुढे कॅम्लिनचा ब्रश, कलर हातात आले. खरतर लहानपानापासूनच कॅम्लिनच्या रंगात मी रंगून गेलो होतो .

पण ‘कॅम्लिन’ हा ब्रँड किती मोठा आहे हे मात्र त्या वयात जाणवलं नव्हतं. 1931 ला वेधशाळेत काम करणाऱ्या आणि महापालिकेत काम करणाऱ्या उच्चशिक्षित बंधूनी नोकरी सोडून सुखासीन सरकारी नोकरीचा ध्यास सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करावा आणि तो देखील शाई बनवण्याचा. वेधशाळेत ढग कसे जमा होतात हे बघण्याच्या ऐवजी लोकांनी तेच ढग आपल्या रंगाने रंगवावेत असं का वाटलं असावं हे त्यांनाच माहीत. शाईच्या पासून सुरु झालेला प्रवासाने, ‘कॅम्लिन’च्या बॅण्डची ठळक मुद्रा जगभर उमटवली. ‘उंट’ ही कॅम्लिनची नाममुद्रा, महाराष्ट्रात न दिसणारा प्राणी नाममुद्रा म्हणून का घेतला याची कथा मला एकदा दांडेकरांनी सांगितलं होता.

शाई ते फाउंटन पेन्स, पेन्सिली, रंगवण्याचे ब्रश, क्रेयॉन्स पासून अनेक प्रकारचे रंग, खोडरबर ते ऑफिसेसला लागणाऱ्या स्टेशनरीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी कॅम्लिनने बनवल्या.

इंग्रजीत एक म्हण आहे जिचा भावार्थ आहे, ‘उंटाच्या पाठीवर काडी ठेवली आणि उंट खाली बसला’. पण दांडेकरांच्या उंटाला कलात्मक उत्पादनाचं कधीच ओझं झालं नाही. मराठी उद्योजकाने घेतलेली ही लक्षणीय उडी.

पुढे काळाच्या ओघात इतर अनेक कंपन्या या क्षेत्रात आल्या, पण ‘कॅम्लिन’च्या उत्पादनांमध्ये जी एक सौंदर्यदृष्टी आहे, ती मात्र कुठल्याच उत्पादनांमध्ये दिसत नाही.

जागतिकरणाच्या ओघात कॅम्लिनचा मोठा हिस्सा ‘कोकुयो’ नावाच्या जॅपनीज कंपनीने घेतला. पण जे मोजके मराठी ब्रँड आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले, त्याची दखल जगाने घेतली त्यात ‘कॅम्लिन’ हा एक महत्वाचा ब्रँड.

आज सुभाष दांडेकरांच्या निधनानंतर हा सगळा पट डोळ्यासमोर आला. ‘कॅम्लिन’ या ब्रँडच्या प्रवासाने किंवा एका उंटाच्या नाममुद्रेच्या प्रवासातुन मराठी मनांनी प्रेरणा घेऊन, मोठी स्वप्न पहायला हवी आणि अर्थात ती प्रत्यक्षात पण उतरवायला हवी.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सुभाषजी दांडेकरांना विनम्र श्रद्धांजली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0