महाराष्ट्र

Shrikant Shinde Nashik Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्रांनी नाशिकच्या उमेदवाराची केली घोषणा

•खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिक दौऱ्यावर असताना नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या खासदाराचे केली घोषणा

नाशिक :- शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या एका उमेदवाराची घोषणा करून टाकली आहे. नाशिक दौऱ्यावर गेलेल्या श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा हेमंत गोडसे हेच महायुतीचे उमेदवार असतील, असे स्पष्ट केले आहे. आपल्याला तिसऱ्यांदा हेमंत गोडसेंना लोकसभेत पाठवायचे आहे असे विधान त्यांनी केले आहे. दरम्यान, महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. त्या आधीच श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये उमेदवाराची घोषणा केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. Shrikant Shinde Nashik Tour

नाशिकला धनुष्यबाणच राहणार नाशिकमधील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, “हेमंत गोडसे यांना आपल्याला तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आणायचं आहे. दुसऱ्या कोणाचे नाव नाही. महाराष्ट्रातून महायुतीचे 45 खासदार आणायचे आहेत आणि त्यात हेमंत गोडसे पण असतील. हेमंत आप्पा तुमचा धनुष्यबाणच नाशिकला राहणार आहे. आपली कामे बघून विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे,” असे सूचक विधान यावेळी श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. Shrikant Shinde Nashik Tour

कोणाला नाराज होण्याचे कारण नाही- खासदार हेमंत गोडसे
आपल्या नावाची घोषणा झाल्यानंतर हेमंत गोडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “गेल्या दहा वर्षात मी केलेली विकासकामे आणि संघटना बांधणी बघता मला पुन्हा ही संधी देण्यात आली असून, विजयाची हॅटट्रिक होणार की नाही? हे नाशिकची जनता ठरवेल. माझी उमेदवारी घोषित झाल्याने कोणाला नाराज होण्याचे कारण नाही” असे गोडसे म्हणाले. Shrikant Shinde Nashik Tour

त्या व्हिडिओमुळे खासदार हेमंत गोडसे चांगलेच आले होते चर्चेत
काही दिवसांपूर्वी खासदार हेमंत गोडसे यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता या व्हिडिओ नंतर खासदार गोडसे यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता या विषयावर अधिक बोलणे टाळले होते त्यानंतर ते चांगलेच ट्रोल झाले होते. Shrikant Shinde Nashik Tour

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0