मुंबईक्राईम न्यूज

Kalyan Crime News : पुर्ववैमनस्यातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ; कल्याण मधील घटना

खडकपाडा पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल, पोलिसांकडून आरोपीला अटक

कल्याण :- पुर्व वैमनस्यातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न कल्याण जवळील आंबिवली परिसरात झाला आहे. या घटनेनंतर फिर्यादी येणे खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे खडकपाडा पोलीस ठाण्यात कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. Kalyan Crime News

10 मार्च 2024 रोजी, रुपेश अशोक सलफे (30 वर्ष) याच्यावर साईबाबा मंदिर जवळ आंबिवली कल्याण येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून रवी उर्फ भुऱ्या बाळाराम पाटील (35 वर्ष ) आणि गणेश मारुती पाटील (40 वर्ष) या दोघांनीही आपापसात संगणमत करून रुपेश याच्यावर धारदार शस्त्रेने वार करून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच रुपेश त्याच्या आईला धक्काबुक्की करून मारहाण केली या घटनेनंतर फिर्यादी रुपेश आणि आरोपींच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या विरोधात भादवि कलम 307,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच त्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडगा हे करत आहे. Kalyan Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0