Shirur Lok Sabha Election : शिंदे यांना अजित पवार यांच्याकडूनच धक्का… शिंदेचा हा नेता 26 मार्चला अजित पवार गटात प्रवेश करणार
Shirur Lok Sabha Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील आता अजित पवार यांच्या गटात 26 मार्चला सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अजित पवार यांनी धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिल्लेदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आता अजित पवार गटात सामील होणार असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये सुरू असलेला शिरुर लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला असून शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. 26 मार्चला आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. शिरुरमध्ये बदला घेण्यासाठीच लढणार असून महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होईल, असा विश्वास आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान शिरुरमधून लोकसभेची निवडणूक Shirur Lok Sabha Election लढवणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचं आव्हान आहे. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आज संध्याकाळी जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल असे सुनील तटकरे म्हणाले. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाच पंतप्रधान बनवायच.45 पेक्षा जास्त खासदार निवडणूक आणण्याच आमच उद्दिष्टय आहे असे सुनील तटकरे म्हणाले.
मी जिंकणार हा जनतेला विश्वास ; शिवाजीराव आढळराव पाटील
शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? असे बाळबोध प्रश्न आता विचारु नका. राष्ट्रवादीचा उमेदवार शिरुरमधून मोठ्या फरकाने विजय मिळवेल. शिरुर-आंबेगाव येथे पक्ष प्रवेशाची मोठी सभा होईल असे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले. पक्ष प्रवेशाआधी माझ एकनाथ शिंदे यांच्याशी बोलण झाले आहे. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल आहे असे आढळराव पाटील यांनी सांगितले. माझ्या कॅलक्युलेशननुसार पहिली निवडणूक 30 हजारने जिंकली. दुसरी एक लाखाने, तिसरी तीन लाखाने आता चौथी निवडणूक रेकॉर्ड मताने जिंकेन, हा मला नाही जनतेला सुद्धा विश्वास आहे असे शिवाजीराव म्हणाले.
कोल्हेंची खोचक टीका
अमोल कोल्हे म्हणाले की, शिरुरमध्ये बेडूक उड्या विरुद्ध एकनिष्ठता अशी लढत आहे. आढळराव पाटील यांना चौथ्या पक्ष प्रवेशाच्या मनपूर्वक शुभेच्छा. राजकीय ताकदवान नेत्यांना उमेदवार आयत करावे लागणे हेच माझे यश आहे.