Uncategorized

 Shirur Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादीचे दोन उमेदवार समोरासमोर, कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा घेतला आशीर्वाद

 Shirur Lok Sabha Amol kolhe VS Adhalarao Patil  : राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून अमोल कोल्हे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील शिरूर लोकसभेच्या रिंगणात

पुणे :- जिल्ह्यातील शिरूर लोकसभा Shirur Lok Sabha मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोनगटात अटीतटीची लढत होत आहे. शरदचंद्र पवार गटाकडून तुतारी चिन्हावर अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे हे निवडणूक लढवत आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घडयाळ चिन्हावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. Amol kolhe VS Adhalarao Patil 

एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे दोन्ही नेते शिवजयंतीच्या अनुषंगाने किल्ले शिवनेरी येथे गुरुवारी एकत्र आले. दोघे एकमेकांच्या समोरासमोर आल्यावर अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव यांचे पाया पडून आशीर्वाद घेत चर्चा केली, यामुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या. Amol kolhe VS Adhalarao Patil 

डॉ. कोल्हे म्हणाले, वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणे ही आपली संस्कृती आहे. आज शिवजयंती असून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी मी शिवनेरीवर आलो आहे. कोणत्याही मंदिरात जाण्यापूर्वी पहिले नतमस्तक मी शिवनेरीवर झालो. किल्लयाचे पहिल्या पायरीचे दर्शन घेतल्यावर मला संघर्षाची, स्वाभिमानाची प्रेरणा मिळते. दिल्लीच्या तख्तासमोर न झुकण्याची आणि स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही ही प्रेरणा शिवनेरी किल्लयावर मिळते. सर्वसामान्य नागरिकांसाठी लढण्याची प्रेरणा द्या हेच मागणे आज मी मागितल आहे.

सन 2019 ची निवडणुक मी शरदचंद्र पवार यांच्या आशिर्वादाने लढली व जिंकली. आताही तेच करत असल्याने माझ्या भूमिकेत कुठे बदल झालेला नाही. शिरुरसह राज्यातील इतर मतदारसंघात देखील मी लक्ष घालत आहे. शिवाजीराव आढळरव यांनी दिल्लीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकही वारी केली नाही. आक्रोश मोर्चाची टिंगल केली, व्यैक्तिक टिका केली परंतु माझे मत धोरणात्मक टिका करा असे आहे. Amol kolhe VS Adhalarao Patil 

किल्ले शिवनेरीवर मी अनेक वर्षापासून येत असून शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन मी माझ्या प्रचाराची सभेस सुरुवात करत आहे. यापुढील आयुष्य हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, कांदाला, दुधाला बाजार भाव मिळण्यासाठी मी कटिबध्द असणार आहे. शेतकरी कुटुंबातील मी असून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे वेदना मला माहिती आहे. नौटंकी करण्याची मला सवय नाही असे यावेळी आढळराव पाटील म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0