क्राईम न्यूजमुंबई

Share Market Fraud बाबत उज्जैन, इंदोर, मध्यप्रदेश मध्ये असलेले कॉल सेंटर उध्वस्त

Share Market Fraud Call Center Busted Mumbai Matunga Police : फ्रॉड कॉल सेंटरचा पर्दाफाश करून,मुख्य आरोपींना अटक करून विविध राज्यातील सायबर गुन्हे उघडकीस

मुंबई :- शेअर मार्केटमध्ये Share Market Fraud गुंतवणूक करून लोकांची फसवणूक करणाऱ्या एक फ्रॉड कॉल सेंटरचे मुंबई पोलिसांनी केले पर्दाफाश केले आहे.माटुंगा पोलीस ठाणे हद्दीतील फिर्यादी चंद्रशेखर आनंदराव तावरे, (56 वर्ष) माटुंगा पूर्व, यांना फेब्रुवारी 2024 मध्ये धारकाने त्यांचे मोबाईल क्रमांकावर फोन करून त्यांना शेअर मार्केटसंदर्भात माहीती देवून तसेच त्याच्या Profit Bull & M/S L B Enterprises, Banglore या कंपनीबाबत माहीती देवून एक बनावट लिंक पाठवून Profit Bull नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना चांगले रिटर्न मिळतील असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरूवातीला 7 हजार 500 गुंतवणुकीवर इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करून चांगले स्टिर्न दाखवून वरीलप्रमाणे वरील ॲप मध्ये लॉगिन करण्यास सांगून NEFT & UPI व्दारे वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण 8 लाख 33 हजार पैसे भरण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादी यांनी पैसे विड्राल करण्याचा प्रयत्न केला असता ते झाले नाही. त्यावेळी त्यांनी आरोपीला संपर्क साधला असता तो पुन्हा वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे पाठविण्यााबाबत सांगू लागला. त्यामुळे फिर्यादी यांना संशय आल्याने त्यांनी पोलीस ठाणेस तक्रारअर्ज दिला होता. त्यानुसार त्यांचा माटुंगा पोलीस ठाणे कलम 409,420,467,468,471 भादविसह कलम 66 क, 66 ड IT Act अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mumbai Crime News

तपास माटुंगा पोलीस ठाणेच्या सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर पगार व त्यांचे सायबर पथकाने आरोपीतांनी वापरलेल्या बँक खात्यांचे विश्लेषण करून आरोपी नामे राज बहादुर राम सिंग भदोरीया, (62 वर्ष), रा. ठि. घर नं. ११८, सैनिक कॉलनी, गोले का मंदीर, ग्वालियर, मध्यप्रदेश यास 06 एप्रिल रोजी मुंबई विमानतळ येथून ताब्यात घेवून अटक केली. नमुद आरोपीकडून वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. Mumbai Crime News

1.4 डेबिट कार्ड व केडीट कार्ड,
2.4 विवध बँक खात्यांचे चेकबुक,
3.03 मोबाईल,
4.15 सिमकार्ड,

वर नमुद आरोपीकडे चौकशी केली असता या प्रकारच्या गुन्हयांतून विविध बँक खात्यांवर आलेले पैसे काढून ते उज्जैन, इंदोर येथे पाठवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अधिक तांत्रिक तपास करून खालील दोन आरोपीतांना 10 एप्रिल 2024 रोजी विजयनगर, इंदोर, मध्यप्रदेश येथून अटक करण्यात आली आहे. 1. अंकित उर्फ राजकुमार श्रीराम शिंदे, (30 वर्ष), इंदोर, मध्यप्रदेश.
2.संजय भगवानदास बैरागी, (28 वर्ष) उजैन, मध्यप्रदेश.
आरोपींकडे अधिक तपास केला असता सदर आरोपी व नमुद गुन्हयातील इतर पाहीजे आरोपी यांचेसह महानंदानगर, उज्जैन, मध्यप्रदेश येथे कॉल सेंटर चालवत असल्याचे समजल्याने त्यानुसार नमुद कॉल सेंटरवर धाड घालून खालील मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.

कॉल सेंटरवरील जप्त मुद्देमाल

१. १६ मोबाईल

२. १५ सिमकार्ड

३. ०१ लॅपटॉप

४. राउटर

५. ०३ लाख पेक्षा अधिक लोकांचा मोबाईल क्रमांकांचा डाटा.

आरोपींनी वापर केलेले मोबाईल क्रमांक, बैंक खाती इ. वरून NCCR Portal वर तक्रारी तपासल्या असता एकूण 39 तकारी आढळून आल्या आहेत. नमुद आरोपी हे 15 एप्रिल 2024 रोजीपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. त्यांचेकडून प्राप्त झालेला डाटा व बैंक खाती याबाबत तपास चालू आहे. Mumbai Crime News

पोलीस पथक


पोलीस आयुक्त, मुंबई, विवेक फणसळकर ( Mumbai CP Vivek Phansalkar ), विशेष पोलीस आयुक्त, मुंबई, देवेन भारती, पोलीस सह आयुक्त, (कायदा व सुव्यवस्था) मुंबई, सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई, अनिल पारसकर, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-04, मुंबई, प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त, माटुंगा विभाग, मुंबई संजय जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, माटुंगा पोलीस ठाणे दिपक चव्हाण, पोलीस निरीक्षक संजय परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली सायबर अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक दिगंबर पगार, पोलीस हवालदार संतोष पवार,मंगेश जन्हाड, (CDR/SDR/Location) निकम, पोलीस शिपाई साळुंखे, परिमंडळ 04, मुंबई) यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0