मुंबई

Sharad Pawar Party Panvel : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाची पनवेल विधानसभा कार्यकारणी जाहीर

पनवेल (वार्ताहर) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar party ) गटाची पनवेल विधानसभा (Panvel Lok Sabha ) कार्यकारणी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांच्या मान्यतेने पनवेल विधानसभा अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी यांनी घोषित केली.
डॉ.मुनीर तांबोळी यांची पनवेल विधानसभा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यापासून पनवेल विधानसभा हद्दीत अनेक तरुणांचा, महिलांचा पक्षात प्रवेश झाला.संघटना जोमाने वाढत आहे.असे यावेळी बोलताना पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील म्हणाले. डॉ.तांबोळी यांनी प्रवेश केल्यापासून पनवेल भागात पक्षाला चांगली ताकत मिळाली आहे.अनेक महिलांनी पक्षात प्रवेश केला आहे.कामोठे येथे लवकरच पतपेढी सुरू करण्याचा मानस असल्याचे देखील सतीश पाटील म्हणाले.पुढील काळात अनेक उपक्रम राबविले जाणार असून पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम जोरात सुरू आहे.असे ही ते म्हणाले.
यावेळी पनवेल विधानसभा उपाध्यक्ष पदी संजोगिता परदेशी, सरचिटणीस पदी सारिका देका, हितेंद्र निकम, सचिव पदी काशिनाथ केंडे, सह सचिव पदी इरफान तांबोळी यांची नियुक्ती करण्यात आली त्यांना जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. Maharashtra Lok Sabha Election Live News Update

त्यावेळी पनवेल विधानसभा अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी,युवक जिल्हा अध्यक्ष शहबाज पटेल,डॉ. श्रेयस ठाकूर, पंकज शहा, नेहा किरनली, श्रियश भावसार यांसह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0