Uncategorized

EaseMy Trips Collaborate with the World Championship of Legends : इझमायट्रिपचा वर्ल्‍ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेण्‍ड्ससोबत सहयोग

मुंबई : इझमायट्रिप या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्‍हल प्लॅटफॉर्मने प्रतिष्ठित वर्ल्‍ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेण्‍ड्स (डब्‍ल्‍यूसीएल)ची प्रेझेन्टिंग पार्टनर म्‍हणून सहयोगाची घोषणा केली आहे. हा सहयोग क्रीडा व मनोरंजन विश्‍वातील महत्त्वाचा टप्‍पा आहे, जेथे जगभरातील चाहत्‍यांना क्रिकेटचा अद्वितीय अनुभव देण्‍यासाठी दोन प्रभावी कंपन्‍या एकत्र आल्‍या आहेत. वर्ल्‍ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेण्‍ड्स क्रिकेटप्रती उल्‍लेखनीय योगदानांसाठी ओळखली जाते आणि प्रेझेन्टिंग पार्टनर म्‍हणून इझमायट्रिपसह लीग अधिक जागतिक मान्यता व सहभाग मिळवण्‍यास सज्‍ज आहे.

इझमायट्रिपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व सह-संस्‍थापक निशांत पिट्टी म्‍हणाले, “आम्‍हाला वर्ल्‍ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेण्‍ड्सची प्रेझेन्टिंग पार्टनर म्‍हणून सेवा देण्‍याचा आनंद होत आहे. या सहयोगामधून क्रीडा सर्वोत्तमतेला अधिक निपुण करण्‍याप्रती, तसेच जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी संस्‍मरणीय अनुभवांची निर्मिती करण्‍याप्रती आमची अविरत समर्पितता दिसून येते.”

वर्ल्‍ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेण्‍ड्समध्‍ये गुंतवणूक केलेले बॉलिवुड अभिनेते अजय देवगण आपला पाठिंबा व्‍यक्‍त करत म्‍हणाले, “मी वर्ल्‍ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेण्‍ड्सचे प्रमुख प्रेझेन्‍टर म्‍हणून इझमायट्रिपचे स्‍वागत करतो आणि मला आनंद होत आहे की, आम्‍ही आपल्‍या दिग्‍गज क्रिकेटिंग हिरोंसोबत नवीन मनोरंजनपूर्ण क्षणांची निर्मिती करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहोत.”

वर्ल्‍ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेण्‍ड्सचे दूरदर्शी संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी हर्षित तोमर या सहयोगाच्‍या महत्त्वाबाबत सांगताना म्‍हणाले, “इझमायट्रिप भारतातील दुसरी सर्वात मोठी ट्रॅव्‍हल कंपनी आहे आणि क्रिकेटपासून टेनिस ते कबड्डीपर्यंत इझमायट्रिप अनेक स्‍पोर्ट्स लीगशी संलग्‍न राहिली आहे. मला विश्‍वास आहे की, इझमायट्रिपला ऑनबोर्ड करण्‍यासह डब्‍ल्‍यूसीएल अधिक प्रबळ होईल.”

क्रिकेटिंग आयकॉन आणि वर्ल्‍ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेण्‍ड्सचे बहुमूल्‍य सदस्‍य सुरेश रैना आपला आनंद व्‍यक्‍त करत म्‍हणाले, “मला डब्‍ल्‍यूसीएलमध्‍ये इंडिया चॅम्पियन्‍ससोबत सामील होण्‍याचा आनंद होत आहे. स्‍पॉन्‍सर्स म्‍हणून इझमायट्रिपसोबत डब्‍ल्‍यूसीएलचा पाया अधिक प्रबळ झाला आहे. एजबस्‍टन येथे इतर क्रिकेटिंग लीजेण्‍ड्ससोबत मैदानावर उतरून तगडी स्‍पर्धा देण्यासाठी आणि तुम्‍हा सर्वांना तेथे पाहण्‍यास अत्यंत उत्सुक आहोत.”

क्रिकेटमधील आणखी एक दिग्‍गज खेळाडू हरभजन सिंग रैना यांच्‍या मताला दुजोरा देत म्‍हणाले, “मला डब्‍ल्‍यूसीएलमध्‍ये इंडिया चॅम्पियन्‍ससोबत सामील होण्‍याचा आनंद होत आहे. सर्वकाही सुरळीत होत आहे, ईसीबीची मान्‍यता मिळाली आहे, तिकिटांच्‍या विक्रीसह उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि आता स्‍पॉन्‍सर्स म्‍हणून आदरणीय ब्रँड्सचा पाठिंबा मिळत आहे. यामुळे डब्‍ल्‍यूसीएलचा दर्जा अधिक प्रबळ होत आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0