मुंबई
Trending

Sharad Pawar Group : भाजपाप्रमाणे Tweet डिलीट करू नका, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट

Ajit Pawar Post :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अधिकृत पेजवरुन उडवली खिल्ली

मुंबई :- अरुणाचल प्रदेशाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याकरिता आले होते. त्यानंतर अजित पवार यांनी त्या Tweet मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा पार पाडली असे आपल्या Tweet मध्ये लिहिले होते Ajit Pawar Post . त्यावरून शरद चंद्र पवार गटांनी Sharad Pawar Group अजित पवार यांचे किल्ले उडवली आहे. अरुणाचल प्रदेश आणि नागालँड मध्ये तितकाच फरक आहे जितका महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये आहे. तसेच, शरद पवार गटाकडून असे सांगण्यात आले की ते Tweet डिलीट करू नका.

अजित पवारांची पोस्ट काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मिडीया एक्सवरती एक फोटो Ajit Pawar Post आणि पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे, अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आणि पदाधिकारी यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे मनापासून स्वागत केले. या भेटीदरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा पार पडली, अजित पवारांची ही पोस्ट शेअर करत शरद पवार गटाने हल्लाबोल केला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सहभागच घेण्यात आला नव्हता. तर मग आमदार झाले तरी कधी? असा सवाल शरद पवार गटाने उपस्थित केला आहे.

अजित पवारांचे Tweet राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवरून ReTweet करण्यात आले आहे. यात अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागीही झाला नव्हता. मग आमदार झाले तरी कधी? असा सवाल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे अधिकृत पेजवरून Tweet

काय….? अरुणाचलप्रदेशमध्ये राष्ट्रवादीचे आमदार…? अहो, अरुणाचलप्रदेशमध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सहभागच घेण्यात आला नव्हता… मग आमदार झाले तरी कधी ? हा आता… अदृश्य शक्तीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे आमदार अरुणाचलप्रदेशच्या यादीत दाखवले असतील, तर ती वेगळी गोष्ट…अरुणाचलप्रदेश आणि नागालँडमध्ये तितकाच फरक आहे जितका महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहे, हे समजणं अत्यावश्यक आहे. आता घटनाबाह्य पद्धतीने सत्तेवर आल्यानंतर हा राज्या राज्यातील फरकांचा गोंधळ उडणारच म्हणा…! त्यामुळे ज्या भाजपसोबत आपण गेलात त्यांच्या, खोटं बोल पण रेटून बोल या परंपरेचा वाण नाही पण गुण लागला हे दुर्दैव !

आपला रोखठोक बाणा अजूनही शाबूत असेल तर, चूक स्वीकारा पण भाजपप्रमाणे Tweet डिलीट करू नका, ही नम्र विनंती!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0