मुंबई

Sanjay Raut On Vasant More : खासदार संजय राऊत यांचा वसंत मोरे यांना सल्ला

•वसंत मोरे यांनी भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊ नये ; संजय राऊत

मुंबई :- राज ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले पुण्याचा शिलेदार वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील अंतर्गत वादाला कंटाळून आणि लोकसभा निवडणूक करिता इच्छुक असलेल्या वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पुन्हा पक्षात कोणत्याही प्रकारे जाणार नाही अशी ग्वाही करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केला आहे. यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वसंत मोरे यांना सल्ला देत म्हणाले की त्यांनी कुठेही जावे परंतु भाजपाच्या वॉशिंग मशीन मध्ये जाऊ नये असा सल्ला संजय राऊत यांनी वसंत मोरे यांना दिला आहे. Sanjay Raut On Vasant More

वसंत मोरेंनी मनसेला रामराम केला, यावर मी काय बोलू… त्यांनी पुढील दिशा ठरवली पाहिजे. लोकसभा लढवायची असेल तर कोणत्या पक्षाकडून हे त्यांनी ठरवलं पाहिजे. वसंत मोरे यांनी फक्त भाजपच्या वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये. शरद पवारांकडून मोरेंनी मार्गदर्शन घेतलं असेल तर चुकीचे काय? शरद पवार देशाचे नेते आहेत, अशी मिश्किल टिप्पणी केली आहे. परिणामी वसंत मोरे भाजपत जाऊ शकतात का, याही चर्चेला तोंड फुटले आहे. Sanjay Raut On Vasant More

राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात धडकली आहे. यावर संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, मी राहुल गांधींच्या सभेच्या तयारीसाठी आलो आहे. चांदवडला सभा आहे, त्यांच्या यात्रेचा फायदा महाविकास आघाडीला होईल. जनतेत जागरूकता होईल आणि परिवर्तन घडेल, असे त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही संजय राऊतांनी भाष्य केले. आमच्या जागावाटपात तेढ नाही. फक्त वंचितला दिलेल्या प्रस्तावाची आम्ही वाट बघतो आहोत. प्रकाश आंबेडकर गेल्या वर्ष भरापासून आमच्याशी चर्चा करत आहेत, असे संजय राऊत म्हणाले Sanjay Raut On Vasant More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0