महाराष्ट्र
Trending

Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका

नाशिक :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस हे कचऱ्याच्या डंपर मध्ये बसलेले असल्याचे म्हटले होते. फडणवीस आणि भाजपचे सर्व नेते हे कचऱ्याचे डंपर असून ते पुढे गुजरात मध्ये जाणार आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. संजय राऊत Sanjay Raut यांच्या या टीकेला आता मंत्री गिरीश महाजन Girish Mahajan यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या काय चुका झाल्या यावर आपण परीक्षण, निरीक्षण केले पाहिजे. ते सोडून इकडे तिकडे उकीरड्यावरची घाण केली, असे म्हणत सकाळपासून वेडेवाकडे आणि घाणेरडे बोलत राहायचे, एवढेच काम संजय राऊत यांच्याकडे राहिले आहे, अशी टीका भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुमच्याकडे 50 चे 5 राहिले आहेत, ते देखील आता राहणार नाही, तरी तुमची मस्ती जात नाही. असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

संजय राऊत यांच्याकडे आता कोणीच राहिले नाही, त्यामुळे बिचाऱ्यांचा तोल जात असल्याचे गिरीश महाजन Girish Mahajan यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. त्यांचा डोक्याचा आता इलाज करायला हवा, असे देखील गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात असताना त्यांना एक फोन आला होता. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमात कोपऱ्यात जाऊन फोनवर संभाषण केले. त्यावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या टीकेवर मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रतिहल्ला केला. जर एखादा महत्त्वाचा फोन असेल, तर स्पीकर लावून बोलायचे का? असा प्रश्न गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. तुम्हाला उद्धव ठाकरे यांचा जर फोन आला तर तुम्ही स्पीकर लावून बोलता का? असा सवाल देखील त्यांनी संजय राऊत यांना विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0