मुंबई

Sanjay Raut : मोदींचे मानसिक संतुलन बिघडलेले ; खासदार संजय राऊत यांची टीका

Sanjay Raut On PM Modi : उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे च्या वारस….. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर सर्जेराव कडून टीका

अहमदनगर :- देशाचे पंतप्रधान लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election प्रचारादरम्यान बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांची प्रकृती बरी नाही. हे चांगल्या मानसिकतेचे लक्षण नाही. त्यांची गाडी रुळावरून घसरली असून भाजपने त्यांना तत्काळ प्रचारातून बाजूला करायला हवे, असा घणाघात ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी केला. नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ अहिल्यानगर येथे आले असता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

Sanjay Raut Target BJP

संजय राऊत काय म्हणाले?

तेलंगणामध्ये उद्धव ठाकरेंवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे वारस नाही हे त्यांच्या बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. त्याला मला जाऊन ते असे म्हणाले काँग्रेस पक्ष अदानी आणि अंबानी यांच्या काळात पैसे निवडणूक लढतोय, राहुल गांधींना या दोन व्यवसायिकांकडून टेम्पो भरून पैसा मिळतोय, असे म्हणतो कोण आहे तर ती व्यक्ती ज्यांना देशातील अनेक गोष्टी अदानी अंबानींना दिल्या. Maharashtra Lok Sabha Election Live Update

नाशिकचे शिवसेने जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. यावर भाष्य करताना राऊत यांनी मिंधे सरकारवर आसूड ओढले. ऐन निवडणुकीमध्ये तडीपारीची नोटीस काढण्यात आली आहे. 4 जूनपर्यंत काय तांडव करायचा तो करा. सगळे गुंड सध्या तुरुंगातून सोडवून मुख्यमंत्र्यांच्या मुलाबरोबर, मुख्यमंत्र्यांबरोबर फिरत आहेत. Maharashtra Lok Sabha Election Live Update

नरेंद्र मोदींनी त्यांच्या आर्थिक आश्रयदात्यावर टीका केली हीच त्यांच्या पराभवाची चाहूल असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर शिवसेना उबाठा गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस दिल्याबद्दल संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत जो आमचा प्रचार प्रमुख आहे, त्याला तडीपार करण्याची नोटीस देऊन हद्दपार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी भूमिका मांडताना संजय राऊत म्हणाले की, लोकसभेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांना अटक होईल किंवा ते आणि त्यांची टोळी तडीपार होईल. Maharashtra Lok Sabha Election Live Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0