मुंबई

Sanjay Raut : फडणवीस फोन टॅपिंग प्रकरणात अपराधी होते त्या प्रकरणी त्यांना अटक होणार होती

•Devendra Fadnavis Phone Tapping Case ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मोठा दावा,बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार होती

मुंबई :- बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव होते. या प्रकरणात जगात कुठेही कोणत्याही नेत्याला किंवा व्यक्तीला अटक होते. यामुळे त्यांना अटकेची भीती वाटत होती, म्हणूनच त्यांनी एकनाथ शिंदेंवर दबाव निर्माण करून त्यांना आमदार फोडण्यास भाग पाडले, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात फडणवीसांना अटक करण्यात येणार होती, असा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यावर आता खासदार राऊत यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस फोन टॅपिंग प्रकरणात अपराधी होते. त्या प्रकरणी तपास चालू होता. त्यांच्या मनात भीती होती की आता कोणत्याही क्षणी मला अटक केली जाईल. त्यांना माहीत होतं की त्यांनी अपराध केले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षांमधील नेत्यांचे फोन टॅप केले होते. त्यासाठी त्यांनी दोन अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या त्यापैकी एक होत्या”, असे राऊत म्हणाले.फडणवीसांनी अनेक नेत्यांचे फोन टॅप केले पुढे प्रसार माध्यमांशी बोलतांना राऊत म्हणाले,

“फडणवीसांनी रश्मी शुक्लांच्या मदतीने अनेक नेत्यांचे फोन टॅप केले. आमचं सरकार त्याप्रकरणी तपास करत होतं. मात्र फडणवीस-शिंदे यांचं सरकार आल्यावर त्यांनी ते गुन्हे मागे घेतले. खरंतर त्यांनी त्या गुन्ह्यांचा तपास करायला हवा होता. मात्र फडणवीस यांच्या मनात भीती होती म्हणून त्यांनी तपास बंद केला. फोन टॅपिंग प्रकरणात जगात कुठेही कोणत्याही नेत्याला, व्यक्तीला अटकच होते. कारण हा एक भयंकर अपराध आहे. फडणवीस यांनी गृहमंत्री असताना हा भयंकर अपराध केला होता”, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, “ज्यांच्याबद्दल तपासा चालू होता त्यांना अटकेची भीती होती. फडणवीसांनाही अटकेची भीती होती. म्हणूनच नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंवर दबाव निर्माण केला. ते एकनाथ शिंदेंना म्हणाले, तुम्ही शिवसेनेचे आमदार फोडा आणि आमच्याबरोबर या. नाहीतर आम्ही तुम्हाला अटक करू. असा सगळा खेळ चालू होता. त्यामुळे शिंदेंनी सरकार पाडले”, असा मोठा दावा राऊतांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0