क्राईम न्यूजठाणे

Anti-Corruption Bureau Thane : लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाची कारवाई ; मोदी याला पाच हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात केली अटक

Thane Bribe News : अन्नसुरक्षा अधिकारी राजू धोंडीराम आकरुपे, यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शोध

वसई :- रोशन मोदी यांनी अन्नसुरक्षा अधिकारी राजू आकरुपे यांच्या सांगण्यावरून तक्रारदार यांच्याकडून पाच हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभाग ठाणे Anti-Corruption Bureau Thane यांच्याकडून अटक करण्यात आले. लाचलुचपत विभागाकडून अन्नसुरक्षा अधिकारी राजू आकरुपे यांचा शोध घेतला जात आहे.

तक्रारदार यांनी 1 एप्रिल रोजी ॲन्टी कराशन ब्युरो ठाणे येथे दिलेल्या तकारीच्या अनुषंगाने 22 एप्रिल 24 रोजीच्या पडताळणी कारवाई दरम्यान लोकसेवक राजू धोंडीराम आकरुपे, अन्न सुरक्षा अधिकारी, ठाणे यांनी तक्रारदार यांचे सिलबंद असलेले दुकान टपरी उपडुन दिलेबाबत 5 हजार‌ रुपये रोशन मोदी (खाजगी व्यक्ती) यांचेकडे देणेबाबत सांगितले असल्याचे मोदी यांनी पडताळणी दरम्यान फोनव्दारे सांगितल्याचे निष्पन्न झाले आहे. Thane Bribe News

त्यानुसार वसंत विहार नाका येथे सापळा कारवाई आजमाविली असता, रोशन मोदी (खाजगी व्यक्ती) यांनी तक्रारदार यांचेकडुन ॲन्थ्रासिन पावडर लावलेली 5 हजार‌ रुपये लाचेची रक्कम स्विकारली असता त्यांना दुपारी 4.34 वा. रंगेहात पकडुन ताब्यात घेण्यात आले आहे सदरची रक्कम आकरुपे यांचेकरीता घेतली असल्याचे (खाजगी व्यक्ती) रोशन मोदी यांनी सांगितल्याने त्याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी आकरुपे यांचेकडे पडताळणी केली असता, आकरुपे यांनी ठिक आहे असे सांगुन गुन्हयास सहमती दर्शवुन प्रोत्साहन दिले. गुन्हा दाखल करण्याची पुढील कारवाई चितळसर पोलीस स्टेशन, ठाणे शहर येथे सुरु आहे. Thane Bribe News

मार्गदर्शक अधिकारी

सुनिल लोखंडे, पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक,ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र,अश्विनी पाटील पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे. Thane Bribe News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0