Sangali Drug Company : सांगलीत एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश, आर्थर रोड जेलमध्ये आरोपींची भेट
Sangali Drug Company Busted : सांगलीत एमडी ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश झाला आहे. यामध्ये 6 आरोपींना अटक करण्यात आली असून ते तुरुंगात सापडले आहेत. आरोपींमध्ये मुंबई आणि वाळवा येथील व्यक्तींचा समावेश आहे.
सांगली :- सांगली जिल्ह्यात एम.डी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश झाला आहे. Sangali Drug Company Busted हा कारखाना चालवणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोमवारी (27 जानेवारी) रात्री उशिरा सांगली पोलिसांनी विटा शहराजवळील कर्वे एमआयडीसी परिसरात असलेल्या एका कंपनीवर छापा टाकून एका मोठ्या ड्रग्ज निर्मितीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याचा भंडाफोड झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपविण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची कसून चौकशी करण्यात आली, त्यानंतर आणखी तीन संशयितांना अटक करण्यात आली.चौकशीदरम्यान हे 6 आरोपी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये भेटल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी सांगितले की, जामिनावर सुटल्यानंतर या 6 आरोपींनी मिळून एमडी ड्रग्ज फॅक्टरी सुरू करण्याची योजना आखली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुंबईतील दोन जणांना तसेच वाळवा तालुक्यातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
जितेंद्र परमार, अब्दुल रज्जाक शेख आणि सरदार उत्तम पाटील अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. राहुदीप बोरीचा (कोसंबा, जि. सुरत), सुलेमान शेख (वांद्रे, मुंबई), बलराज अमर कटारी (24 वय, जि. विटा) हे सांगलीच्या विटाजवळील कार्वे येथील बंद कारखान्यात एमडी ड्रग्ज बनवत होते.या आरोपींकडून 29 कोटी रुपयांचे 14 किलो 500 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हे ड्रग्ज रॅकेट किती मोठे आहे आणि ते कुठे ड्रग्ज पुरवायचे याचा शोध घेत आहेत.