National Park : मुंबईच्या प्राणी प्रेमींकरिता आनंदाची बातमी संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सिंहीणी मानसीने एका लहान पिल्लाला जन्म दिला.

National Park: अनेक वर्षांनंतर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मानसी नावाच्या सिंहिणीने एका चिमुकल्या पिल्लाला जन्म दिला आहे.
मुंबई :- मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. उद्यानात एक छोटा पाहुणा आला आहे. येथील लायन सफारीमध्ये तब्बल 14 वर्षांनंतर मानसी या सिंहिणीने चिमुकल्या पिल्लाला जन्म दिल्याने या उद्यानात आनंदाचे वातावरण पसरले आहे.या शावकाचा जन्म 16 जानेवारी 2025 (गुरुवार) रोजी झाला, जो उद्यानाचा स्थापना दिवस होता. लायन सफारीमध्येच सिंहिणीने आपल्या पिल्लाला जन्म दिला आणि आता हे नवे शावक सफारीचे महत्त्वाचे आकर्षण बनले आहे.
सिंहिणी ‘मानसी’ आणि सिंह ‘मानस’ डिसेंबर 2022 मध्ये गुजरातमधून आणण्यात आली होती. या दोघांनाही येथे प्रजननासाठी एकत्र ठेवण्यात आले होते. मात्र, ‘मानसी’ला काही काळापूर्वी आजार झाला आणि ती तब्बल 18 दिवस आजारी राहिली.पण, पार्क टीमने तिची विशेष काळजी घेतली आणि नंतर ऑक्टोबर 2024 मध्ये मानसी गरोदर असल्याचे आढळून आले. 16 जानेवारी रोजी सिंहिणीच्या गर्भधारणेच्या 108 दिवसांनी तिने एका सुंदर आणि गोंडस पिल्लाला जन्म दिला.