Dhananjay Munde : सनसनाटी, धादांत खोटे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी खोटे आरोप करायचे ; धनंजय मुंडे यांच्याकडून अंजली दमानिया यांच्यावर पलटवार

Dhananjay Munde answer to Anjali Damania : कृषी मंत्रीपदावर असताना शासनाच्या नियमाप्रमाणेच काम केल्याचे धनंजय मुंडे म्हणाले आहे
मुंबई :- बीड सरपंच हत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया Anjali Damania यांनी पहिल्या दिवसापासूनच मंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांच्यावर बेछुटपणे आरोप केले आहे. धनंजय मुंडे सरपंच हत्या प्रकरणातील सूत्रधार असलेले वाल्मीक कराड यांचे अतिशय निकटवर्तीय असल्याचे म्हटल्याने या हप्त्याच्या कट मध्ये धनंजय मुंडे यांचाही हात असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केले आहे. त्यानंतर अंजली दमानिया यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कृषी विभागात मंत्री धनंजय मुंडे हे पदभार स्वीकारताना एक वर्षात तब्बल कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यावर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन अंजली दमानिया यांनी केलेले आरोप खोटे आहेत. सनसनाटी, धादांत खोटे आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी आरोप केला जात आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की गेल्या 59 दिवसांपासून माझ्यावर मीडिया ट्रायल चालू आहे. ते का चालू आहे? कोण चालवत आहे? याचे मला माहित नाही. यावेळी अंजली दमानिया यांचा उल्लेख करताना धनंजय मुंडे यांनी अंजली बदनामिया असा केला आहे.
अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्या विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले की आम्ही शांत बसलो म्हणजे आम्हाला बोलता येत नाही असं होत नाही. मुख्यमंत्र्यांचे अधिकार हे मुख्यमंत्र्या आयोजित दमाने यांना माहित आहे का? प्रश्न यावेळी उपस्थित केला आहे. तसेच अंजली दमान या खोटेपणा हा केवळ आपला बदनाम करण्यासाठी करत असल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला आहे.
अंजली दमानिया जेव्हापासून आरोप करतात तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी केलेला एकही आरोप सिद्ध झाला आहे का? असा प्रश्न देखील धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. या आधी ज्या नेत्यांवर त्यांनी आरोप केले, त्या नेत्यांकडे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. असे देखील मुंडे यांनी म्हटले आहे. संतोष देशमुख यांचे आरोपी मारले गेले आहेत, असा दावा देखील दमानिया यांनी केला होता. हा देखील दमानियांचा खोटेपणा होता, असे देखील मुंडे यांनी म्हटले आहे. आरोप करण्याचे काम ज्यांनी केले, त्यांना शुभेच्छा. मात्र, माझे राजकीय आयुष्य मायबाप जनतेवर अवलंबून असल्याचा दावा देखील मुंडे यांनी केला आहे.
मी मंत्री असताना कृषी विभागात जी प्रक्रिया राबवली गेली ती पूर्ण पूर्व मान्यतेनेच राबवली गेली असल्याचा दावा मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यामध्ये विविध कंपन्यांकडून स्पर्धात्मक दर मागवले गेले होते. त्यात जास्तीत जास्त कंपन्यांनी सहभाग व्हावे म्हणून दोन वेळा निविदा प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली होती. भ्रष्टाचार करायचा असता तर दोन वेळा मुदत वाढ देईल का? असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला.
मात्र साप साप म्हणून जमीन थोटपणे, मीडियातून सनसनाटी निर्माण करणे आणि एखाद्याच राजकीय आणि सामाजिक आयुष्य संपवणे एवढे सोपे नसते, असे आव्हान देखील मुंडे यांनी दिले आहे.