Rohit Pawar: रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जिवाला धोका ; सुळेंनी अधीक्षकांना लिहिले पञ
Supriya Sule Write Letter To Pune Police : दौंड, ता. २२ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या Baramati Lok Sabha Election 2024 उमेदवार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलीस अधीक्षकांना एक पञ लिहीलं आहे. आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना तातडीने पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी या पञातून सुप्रिया सुळे यांनी केली आहे. प्रचारादरम्यान रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना दडपशाहीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. Rohit Pawar Life Threat
खासदार सुळे यांनी पञात म्हटले आहे की रोहित पवार आणि युगेंद्र पवार निवडणूक प्रचारार्थ आणि गावभेट दौरा अंतर्गत ठिकठिकाणी जात आहेत. रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे संवैधानिक आणि शांतपणे नागरिकांशी संवाद साधत आहेत. परंतु काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. घेराव घालून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. Rohit Pawar Life Threat
रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीवाला धोका आहे, तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्ह्याचे डॅशिंग आणि शिस्तप्रिय अधिकारी पंकज देशमुख यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. Rohit Pawar Life Threat